वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून आपल्या मनाप्रमाणे वाहन चालवणारे अनेकजण तुम्हाला रोज दिसत असतील. आपल्या जीवाचा, कुटुंबाचा विचार न करता रोज हजारो लोक जिवाशी खेळ करतात. जेव्हा आपण रस्त्यावर चालतो तेव्हा आपण थोडेसे बेफिकीर असतो. कधी मस्तीच्या मूडमध्ये आपण गाडीचा वेग वाढवतो. कधी-कधी असं होतं की आपण सीट बेल्टही बांधत नाही. एवढेच नाही तर दुचाकी चालवताना हेल्मेटही घालत नाही. (Viral video children grow up in 25 years due to carelessness lives are lost in 25 seconds)
अशा स्थितीत अपघात होऊन गंभीर जखमी होतात. कधी कधी अति दुखापतीमुळे व्यक्तीचा मृत्यूही होतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला गाडी चालवताना केलेल्या निष्काळजीबद्दल एक आई म्हणून भावना करत आहे. 1 मिनिट 06 सेकंदाचा हा व्हिडिओ सर्वांनी पाहायलाच हवा असा आहे. (A video of Indra Choudhary Gathala)
लग्नानंतर रोज साडीच नेसावी लागणार; नवरीकडून त्यानं कॉन्ट्रॅक्टवर सहीच घेतली आणि..
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला सांगतेय, निष्काळजीपणामुळे तरुण मुलांचा हकनाक जीव जातो. मुलांना गाडीचं एक्सिलेटर पिळताना वाटतं की आपण स्मार्ट-हॅण्डसम दिसतो. पण तसं नाही. तुम्ही बेपर्वा, बेफिकीर आणि बेवकूफ दिसत. जरा आईचा तरी विचार करा, तरुण मुलाचं प्रेत पाहून काय वाटत असेल त्या आईला? लहान लेकरु वाढवत, पालनपोषण करत मोठं करायला पालकांची २५ वर्षे खर्ची पडतात. वेगात गाडी चालवून होणाऱ्या अपघातात २५ सेकंदात तो मुलगा दगावतो, त्याची ती अवस्था आईवडिलांनी कशी पहायची?
हिरो बनण्यासाठी लोक वेगाने गाडी चालवतात, त्यामुळे ते अपघाताला बळी पडतात. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर गांभीर्याने शेअर केला जात आहे.
रिकामा डबा पाठवला तरी चालेल'! मेसमध्ये जेवणाऱ्या लेकीच्या मैत्रिणीला एका आईनं लिहिलेलं मायेचं पत्र
हा व्हिडिओ @bindudhillon111नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, ही महिला जे काही बोलत आहे, ती अगदी सत्य सांगत आहे. दुसरीकडे, दुसर्या युजरने कमेंट करताना लिहिले आहे – खरोखरच हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट सांगितली आहे.
कोण आहे ही महिला?
हा व्हिडिओ इंद्रा चौधरी गाथालाचा आहे. इंद्रा या राजस्थानमधील सीकरच्या रहिवासी आहेत. त्या सीकरमधील भाजपच्या जिल्हाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी ग्राहक न्यायालयात वकील म्हणून काम केले आहे. आता त्या समाजिक समस्या सोडवण्याबाबत खूप सक्रिय आहेत. या व्हिडिओमध्ये इंद्रा चौधरी तरुणांना जीवनाचे महत्त्व पटवून देत त्यांना सांगत आहेत की, वेगाने वाहने चालवू नका. अनेक आयएएस अधिकारी आणि वरिष्ठ पत्रकारांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.