Join us

Viral video during paragliding : पॅराग्लायडिंग करताना घाबरली तरूणी, म्हणते 'अजून माझं लग्न झालं नाही'; समोरुन आलं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 15:45 IST

Viral video during paragliding : व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की, मुलगी त्या मुलाला म्हणते की, 'भाऊ, माझे अजून लग्न झालेले नाही'. यावर पॅराग्लायडिंग करणारा मुलगाही आवेशात म्हणतो, 'माझे अजून लग्नही झालेले नाही.'

सोशल मीडियावर नेहमीच वेगेवगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. सध्या पॅराग्लायडींगचा व्हिडीओ चांगला धुमाकूळ घालतोय. (Paragliding Video Viral) याआधीही पॅराग्लायडींगमुळे घाबरलेल्या एका माणसाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तो आपल्या मित्राला 'लॅण्ड करादे' असं म्हणतो. आजही लोक त्याला पॅराग्लायडींगवाला याच नावानं लोक ओळतात. (Girl Paragliding Video Viral) 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी पॅराग्लायडिंगसाठी गेली आहे. पॅराग्लायडिंग करताना ती घाबरलेली दिसत आहे. दरम्यान, पॅराग्लायडिंग करणाऱ्या मुलाशी तिने केलेले संभाषण ऐकून तुम्हाला पोट धरून हसायला भाग पडेल. हा व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणांहून लाखो वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत की, 'हिंमत नसताना तुम्ही पॅराग्लायडिंगला का गेलात?' मोठ्या संख्येने नेटिझन्स हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की, मुलगी त्या मुलाला म्हणते की, 'भाऊ, माझे अजून लग्न झालेले नाही'. यावर पॅराग्लायडिंग करणारा मुलगाही आवेशात म्हणतो, 'माझे अजून लग्नही झालेले नाही.' आता तुम्ही विचार करत असाल की सगळी मजा इथेच संपते. नाही! आता व्हिडिओची खरी मजा येते. जेव्हा ती मुलगी समोर म्हणते की 'तुझं तर झालंच नाही ना? मला तर  करावे लागेल.

बोंबला! जेवताना नवरीनं पुढ्यातला भात घेतला अन् नवरदेव चांगलाच संतापला; पाहा त्यानं काय केलं

इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes या अकाऊंटवरून व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. येथून हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. आतापर्यंत 2573 लोकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. त्याचवेळी, बहुतेक लोक व्हिडिओवर विनोदी कमेंट करत आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियापॅराग्लाइडिंग