भारतातील जवळपास सगळ्याच राज्यात आता ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवास (free travelling by bus) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) झाला असून ते खरोखरच या निर्णयाने सुखावले आहेत. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी. त्यामुळे काही जणांसाठी हा निर्णय खूपच उपयुक्त आहे, तर काही जणांना आर्थिक स्थिती चांगली असल्याने त्याची गरज नाही. पण तरीही फायदा मिळाला आहे, तर त्याचा उपयोग करून घ्यायलाच पाहिजे, या विचाराचे अनेक जण आहेत. अर्थात त्यात काहीच गैरदेखील नाही.
एवढेच नाही, तर या निर्णयाचा गैरफायदा घेणारेही अनेक जण आहेत. ७० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना एसटीने मोफत प्रवास करण्याची परवानगी आहे.
नवरात्रात करा खास फराळी उपवासाचे दहीवडे! मऊ लूसलूशीत आणि चविष्ट फराळी दहीवड्यांची खास रेसिपी
आता याचा लाभ मिळावा म्हणून ७० पेक्षा कमी वय असणारेही वय जास्त असल्याचे भासवतात. जन्मतारखेची खोटी प्रमाणपत्रे आणतात. आणि पात्रतेत बसत नसतानाही या संधीचा फायदा घेतात. पण या आजी मात्र यासाठी अपवाद ठरल्या आहेत. म्हणूनच तर या स्वाभिमानी आजींचे सर्वत्र कौतूक होत आहे.
#WATCH || 'இலவசம்னு சொல்லிவிட்டு பொதுமக்களை ஓசி டிக்கட் என்று அவமான படுத்துவதா?' - கொந்தளித்த மூதாட்டி!https://t.co/gkgoZMqkWC | #coimbator | #OCTicket | #TNGovt | @mkstalinpic.twitter.com/fmFm2BcEPD
— Indian Express Tamil (@IeTamil) September 29, 2022
या आजी कोईंबतूर येथील आहेत. त्यांच्याकडे बघूनच त्यांच्या वयाचा बरोबर अंदाज येतो. पांढरे केस, सुरकुतलेली त्वचा पाहून या आजींनी सत्तरी केव्हाच ओलांडली आहे, हे जाणवते.
अफलातून ! साडीच्या पदरावरची नक्षी जशीच्या तशी रांगोळीतून साकारली, पाहा महिलांची अप्रतिम कलाकुसर
त्यामुळे त्या निश्चितच एसटीने मोफत करण्याच्या सुविधेस पात्र आहेत. पण त्यांनी मात्र मोठ्या स्वाभिमानाने ही फुकटची सुविधा नाकारली. माझ्याकडून पुर्ण पैसे घ्या, मला तिकिट द्या आणि त्यानंतरच मी बसने प्रवास करेल, असे कंडक्टरला बजावले. कंडक्टरने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आजींनी ऐकलेच नाही. शेवटी कंडक्टरने त्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांना तिकीट दिले आणि त्यानंतरच त्या आजी सुखावल्या. माझी पात्रता आहे, तर फुकट प्रवास कशाला करायचा, असं या आजींचं म्हणणं होतं.