आपण म्हातारे झालो तरी तरुण दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. वाढलेलं वय आपल्याला अनेकदा मान्य होत नाही आणि ते आपल्या चेहऱ्यावर दिसू नये असंही आपल्याला वाटत असतं. मग यासाठी कोणी ब्यूटी ट्रिटमेंटस घेते तर कोणी यंग दिसावेत असे कपडे वापरते. इतकेच नाही तर भरपूर मेकअप करुन आणि हटके हेअरस्टाईल करुनही अनेक जण तरुण दिसण्याचा अट्टहास करतात. पण तुम्हाला खरंच उतारवयातही फिट आणि फाईन राहायचं असेल व्यायामाला पर्याय नाही. आणि एकदा तुम्हाला या व्यायामाची (Fitness) सवय लागली की तुमची तब्येत तर ठणठणीत राहीलच पण तुमचे वयही तुमच्या चेहऱ्यावर दिसून येणार नाही. व्यायामामुळे तुमचे स्नायू टोन्ड राहतील आणि त्वचा लूज पडणार नाही. विशेष म्हणजे साठीनंतरीही तुम्ही अवघ्या पंचवीशीत असल्यासारखे दिसाल. आता ते कसे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खाली दिलेला व्हिडिओ नक्की पाहा (Viral Video).
लेस्ली मॅक्सवेल या महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही महिला ६३ वर्षांची असून आपल्या फिटनेसने तिने शरीर इतके बळकट बनवले आहे की तिचे वय ६३ न वाटता ते खरंच २५ च्या तरुणींनाही लाजवेल असे आहे. तिची फिगर आणि त्वचेचा पोत अतिशय यंग दिसत असल्याने ही महिला खरंच इतक्या वर्षांची आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. लेस्ली इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या व्यायामाचे फोटो नेहमी शेअर करतात आणि इतरांनाही अशाप्रकारे व्यायाम करण्याचे सल्ले देतात. त्या काहीही झाले तरी व्यायामात खंड पडू देत नाहीत, इतकेच नाही तर इतरांनीही आपल्याकडून प्रेरणा घ्यावी असे त्यांना वाटते. या वयातही त्या अगदी सहजपणे व्यायाम करत असल्याचे त्यांच्या व्हिडिओमधून दिसते.
फिटनेस ट्रेनर हाच त्यांचा व्यवसाय असून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहून त्यांचे वय ६३ असेल यावर आपला नक्कीच विश्वास बसणार नाही. सोशल मीडियावर त्यांचे ८३ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओ आणि फोटोलाही मोठ्या प्रमाणात कमेंटस येत असून त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होते. आता यातले नक्की किती खरंच त्यांना फॉलो करतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम करतात हा प्रश्नच आहे. पण या वयातही लेस्ली यांच्यात असलेली जिद्द आणि चिकाटी पाहून आपल्याला निश्चितच आश्चर्याचा धक्का बसतो. एकीकडे पन्नाशी उलटली की आरोग्याच्या तक्रारींनी हैराण झालेल्या व्यक्ती आपल्या आजुबाजूला असताना लेस्ली या तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहेत.