Join us

Viral Video: फिटनेसवाली शादी, कोण जिंकणार सांगा आधी? नवरा- नवरीने भर मांडवात स्टेजवरच सुरू केले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 14:05 IST

Social Viral: एकेका लग्नात काय काय गोष्टी घडतात, काही सांगता येत नाही.. आता याच लग्नाची गोष्ट पहा ना.. नवरा नवरीने चक्क भर मांडवात स्टेजवरच सुरुवात करून टाकली...

ठळक मुद्देचार दिवसांपुर्वीच शेअर झालेला हा व्हिडिओ सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. 

साेशल मिडियावर सध्या फिटनेस प्रेमी कपलचा (fitness lover couple) एक व्हिडिओ भलताच धुम करतो आहे. फिटनेसची आवड असणं ही खूप चांगली गोष्ट आहे. अगदी दररोज न चुकता काही वेळासाठी तरी का होईना पण व्यायाम केलाच पाहिजे.. या सगळ्या गोष्टी अगदी कबूल आहेत. पण म्हणून काय कोणी असं करतं का.. या जोडप्याने तर खरोखरंच कमाल केली आहे. व्यायाम करण्यासाठी त्यांनी त्यांच्या लग्नाचा दिवसही सोडला नाही.. असं हे अतरंगी जोडपं सध्या नेटकरींचं लक्ष वेधून घेत आहे. (pushups at wedding hall)

 

तर त्याचं असं झालं की ऐन लग्नात भर मंडपात जमलेल्या सगळ्या वऱ्हाडींसमोर नवरा- नवरी चक्क पुशअप्स करत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या bridal_lehenga_designn या पेजवर शेअर करण्यात आला आहे. चार दिवसांपुर्वीच शेअर झालेला हा व्हिडिओ सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. 

 

या व्हिडिओबाबत असं सांगितलं जातं की या नवविवाहित जोडप्याला फिटनेस चॅलेंज देण्यात आलं होतं आणि त्यासाठीच ते दोघही पुशअप्स करत आहे. नवऱ्याने मस्त शेरवाणी, फेटा घातला आहे, तर नवरी घागरा आणि हेवी दागदागिने घालून नटली आहे. दोघांच्याही गळ्यात वरमाला आहे. आता एवढा सगळा लवाजमा घेऊन पुशअप्स करायच्या म्हणजे काय तोंडची गोष्ट थोडीच आहे.. तरीही ते दोघेजण अतिशय उत्तम पद्धतीने पुशअप्स करत आहेत. त्यामुळेच तर त्यांच्या फिटनेसवाल्या लग्नाची भारी गोष्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.  

टॅग्स :सोशल मीडियाइन्स्टाग्रामलग्नफिटनेस टिप्सव्यायाम