नवरात्रीचा उत्सव म्हटला की महिलांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असतो. नऊरात्रीच्या (Navratri special) नऊ दिवसांत यंदा कोणकोणते रंग आहेत, ते आधीच बघून ठेवणे. त्यानुसार मग दररोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या, त्यानुसार मॅचिंग ज्वेलरी घालणे, मेकअप करणे असा सगळा एकंदरीतच या काळात उत्साह असतो. त्यात देवीची उपासना, रोजचा उपवास आणि मग दांडिया नाईट्स (dandiya nights) असा सगळा कार्यक्रम ठरलेला असतो. पण ज्यांना हे सगळं निवांत करायला वेळ मिळत नाही, त्या महिला त्यांना मिळालेल्या काही निवांत क्षणांचा कसा सुंदर उपयोग करतात, हे सांगणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे (Garba dance by women in Mumbai local).
मुंबई आणि तिथलं धावपळीचं जग अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यातल्या त्यात मुंबईकर वर्किंग वुमनचे बिझी शेड्यूल कसे असते, हे सांगणारेही बरेच किस्से असतात.
नवरात्र स्पेशल फूड : लालचुटूक बीट खाण्याचे ५ फायदे, वजन आणि बीपीचं टेन्शन आहे तर..
या महिलांचा खूप जास्त वेळ ट्रॅव्हलिंगमध्ये जातो. त्यामुळे मग लोकलमध्ये मिळालेल्या वेळेचा त्या चांगला सदुपयोग करतात. लोकलमध्ये बसून भाज्या निवडणे, वाती वळणे, विणकाम करणे, वाचन करणे असे प्रत्येकीचे काही ना काही चालू असतेच. आता मात्र नवरात्रीचा सिझन असल्याने लोकलच्या महिला विंगेत महिला वर्गाची जबरदस्त धमाल सुरू आहे. सगळ्या मैत्रिणी मिळून लोकलमध्ये मस्तपैकी गरबा खेळत आहेत.
That's josh of joshili #Mumbai#Garba fever witnessed #Navratri special in case someone is not aware we Mumbaikars wear 9 days 9 colors and exhibit our true colors of celebration symbolizing unity #lifeline of Mumbai is #LocalTrainhttps://t.co/oMYjKgkVLS
— Urvashi.Khona (@urvashikhona) September 28, 2022
Mumbai Railway Users या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जवळपास ८ ते १० जणींनी एकत्र येऊन डब्याच्या मध्यभागात जमेल तसे रिंगण केले आहे.
गुलाबी रंगाचा ड्रॅगन फ्रुट चहा? हिंमत असेल तर हा चहा पिऊन दाखवाच.. व्हिडिओ व्हायरल
मोबाईलवर एक छानसे गरबाचे गाणे लावले आहे आणि सगळ्या जणी सुंदर गरबा करत आहेत. विशेष म्हणजे बहुतेक जणींनी यंदाच्या नवरात्रीतल्या प्रत्येक दिवसाच्या रंगसंगतीनुसार लाल रंगाचे कपडे घातले होते. उत्साह असेल तर कुठेही आणि कसेही एन्जॉय करता येते, हेच या महिलांचा उत्साह पाहून कळते.