Join us  

Viral Video : स्कूटी शिकण्याची हौस चांगलीच महागात पडली; स्वत:बरोबर काकांनाही घेऊन दणकन आपटली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 1:53 PM

Viral Video : ट्रोलर्स अशा मुलींना सहसा 'पापा की परी' म्हणतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल.

सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये लोक गाडी शिकताना आदळतात आणि कधी कधी तर इतर वाहनांचं मोठं नुकसानही होतं. त्यातल्या त्यात मुली गाडी चालवताना जराही चुकल्या तर सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातं. असं असलं तरी बायका उत्तम गाड्या चालवतात. त्यावरचे विनोद जुने आणि बोअर झाले. पण गाडी शिकताना अशा गमती होऊ शकतात. ज्यामुळे कधी खळखळून हसायला येतं तर कधी चालवणाऱ्या व्यक्तीला दुखापत होऊ शकते. म्हणूनच काळजी घेत नीट प्रशिक्षण घ्यायला हवं.  (Girl was learning to drive a scooty hits uncle at home video viral on internet)

ट्रोलर्स अशा मुलींना सहसा 'पापा की परी' म्हणतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल. होय, इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी घराच्या बाहेरील आवारात कशी स्कूटी चालवायला शिकत आहे. ती गाडीवर बसते आणि तिला मार्गदर्शन करण्यासाठी एक काका तिथे असतात.

ते तिला स्कूटीचा एक्सलेटर हळू हळू वाढवण्यास सांगितात, मात्र ती मुलगी त्याकडे लक्ष देत नाही आणि वेगानं एक्सलेटर देते आणि पुढे जाऊन दणकन आपटते. मुलीने एक्सलेटर चालू करताच तिचा तोल  जातो आणि ती स्कूटी घेऊन काकांच्या अंगावर पडते. या मुलीला फारसा त्रास झाला नसला तरी काकांना किरकोळ दुखापत झाली असावी.मुलीने स्कूटी जोरात चालवताच काकाही जमिनीवर कोसळले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा मुलगी स्कूटीवरून पडली तेव्हा ती हसायला लागली.

बाबौ! नवरा नवरी स्टेजवर असताना अचानक एकजण बुरखा घालून आला; अन्  काय घडलं पाहा.....

यावर काकाही संतापलेले दिसून येतील. व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतो. सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ पाहून लोक हसत आहेत. इन्स्टाग्रामच्या अनेक मीम पेजवर तो व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत. एका युजरनं, 'अंकल का लुक कुछ ऐसा था, गलती कर दी इसे दिलाकर, साइकिल दे देता.' अशी विनोदी कमेंट केली आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया