Join us

Viral Video : बोंबला! भर मंडपात नवऱ्याच्या मित्रांनी असं काही गिफ्ट दिलं; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 16:44 IST

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, लग्नाच्या वेळी वराच्या मित्रांनी एक मजेदार विनोद केला, ज्यामुळे वरालाच लाजल्यासारखं झालं. 

कधीही कोणाचे लग्न ठरले की सगळ्यात आधी मित्र खूप खुश होतात. लग्नात मित्रांनी मस्करी केली नाही तर वातावरण थोडं फिकट वाटायला लागतं. वराच्या घोड्यावर चढण्यापासून ते वधू सासरच्या घरी जाण्यापर्यंत वराला त्याच्या मित्रांची सदैव साथ असते. कधी-कधी मित्रमैत्रिणी असा विनोद करतात की हसू आवरत नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये वराच्या मित्रांनी त्यांच्या जोक्सने लोकांना खूप हसवले. असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. (Groom became embarrassed when friends do this in front of bride in wedding)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, लग्नाच्या वेळी वराच्या मित्रांनी एक मजेदार विनोद केला, ज्यामुळे वरालाच लाजल्यासारखं झालं. मात्र, मित्रांचे असे कृत्य पाहून वराला  क्षणभर लाजिरवाणे व्हावे लागले. लग्न लागल्यानंतर वधू-वर स्टेजवर उभे होते, पण तेवढ्यात वराचा एक मित्र तिथे आला आणि त्याच्या हातात रिकामी पिशवी दिली यानंतर जे झाले ते पाहून तुम्ही लोट पोट होऊन हसाल. वराचे बाकीचे मित्र एक एक करून स्टेजवर येऊ लागले आणि त्या पॉलिथिनमध्ये घरातील लहान-मोठे सामान ठेवू लागले.

गिफ्टच्या नावावर दिल्या अशा वस्तू

कोणी रिकाम्या पॉलिथिनमध्ये बाथरूमचा ब्रश टाकत  होतं, तर कोणी चाळणी, पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही. 10 पेक्षा जास्त मित्र येतात आणि वराची चेष्टा करतात. लग्नाच्या दिवशी सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वराच्या मित्रांचे विनोद पाहून वधूलाही हसू आले. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओवर लोक विनोदी प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरललग्न