Join us  

भर लग्नात सर्वांदेखत तरुणानं नवरीला पळवलं, नवरदेव बसला गप्पा मारत- व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 11:42 AM

Viral Video Groom was busy talking to another woman boy took the bride away : दुसऱ्या महिलेशी गप्पा मारत बसणे नवरदेवाला पडले महागात...

ठळक मुद्देमौके पर चौका अशी कॅप्शन देण्यात आली आहे. १ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहेबायकोकडे लक्ष न देता शेजारी बसलेल्या बाईशई गप्पा मारणे पडले महागात...

लग्नमंडपात अनेकदा काही गमतीजमती घडत असतात. विशेष म्हणजे या गोष्टींचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. कधी नवरा स्वत:च्याच लग्नात दुसऱ्या मुलीशी गप्पा मारत असतो तर कधी नवरी आणखी काही करत असते. नवरीने नवऱ्याला पाण्यात ढकलल्याचे, कधी नवरीच पाणीपुरीवर ताव मारत असल्याचे तर कधी नवरी ऐन लग्नाच्या मुहूर्तावर ऑफीसचे काम करत असल्याचे व्हिडिओ समोर येतात. (Viral Video) ऐन लग्नाच्या मुहूर्तावर बोहल्यावरुन पळून जाण्याचे सीन आपण चित्रपटातही पाहतो. असेच काहीसे प्रत्यक्षात घडले असून लोक त्याची जोरदार मजा लुटतात (Groom was busy talking to another woman boy took the bride away). 

(Image : Google)

तर लग्नमंडपात नवरा आणि नवरी खुर्चीत बसले आहेत. त्यावेळी नवरा त्याच्या बाजूला असलेल्या एका बाईशी बोलताना दिसत आहे. इतक्यात मागून एक व्यक्ती येतो आणि तो नवरीची मांग भरतो. इतकेच नाही तर तो तिला चक्क नवरा शेजारी असतानाच पळवूनही नेतो. विशेष म्हणजे नवरा शेजारीच बसलेला असूनही आपल्या मागून येऊन कोणी आपल्या बायकोची ५ वेळा मांग भरत असल्याचे त्याच्या लक्षातही येत नाही इतका तो बोलण्यात गर्क आहे. मांग भरल्यानंतर हातानेच चल अशी खूण करत तो तिला उठायला सांगते. नवरीही हळूवार उठते आणि चालत हळूच स्टेजच्या मागून हा नवरा तिला पळवूनही नेतो. 

 

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर नेटीझन्स भरपूर चेष्टा करताना दिसत आहेत. कॅमेरामध्ये ही घटना अगदी परफेक्ट कैद झाली असून काही वेळात हा व्हिड़िओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामच्या Shitty.humours या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून त्याला मौके पर चौका अशी कॅप्शन देण्यात आली आहे. १ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून ११ हजारहून अनेकांनी तो लाईक केला आहे. नेटीझन्सनी या व्हिडिओवर भरपूर कमेंटसही केल्या आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालग्न