आता मुळात छान नटून- थटून तयार होणं, एखादा छोटेखानी कार्यक्रम असला किंवा सहज चक्कर मारायला बाहेर जायचं असलं तरी छान तयार होऊन जाणं, हा महिलांचा स्वभाव असतो. काही जणी त्याला अपवाद असतात. पण बहुतांश मैत्रिणींना मात्र मेकअप करणं, छानसं तयार होणं आवडतं. आता महिलांच्या मेकअप करण्यामुळे किंवा नटण्या- थटण्यामुळे कार्यक्रमासाठी कसा उशीर होतो, याचे खुमासदार विनोदी किस्से ऐकवणं आणि ऐकणं हा पुरुषांच्या चर्चेमधला एक महत्त्वाचा भाग असतो. म्हणूनच अशा सगळ्या नवऱ्यांपेक्षा वेगळा असणारा तो नवरा (Husband Helps His Wife For Makeup) सध्या महिलांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.(viral video)
@Gulzar_sahab या ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आलेला एक मस्त व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर ट्रेण्डिंग आहे.
घोरण्याच्या सवयीमुळे चारचौघांत लाज वाटते? ३ सोपे उपाय करून बघा, घोरणं कमी होईल
या व्हिडिओमध्ये तो नवरा जे काही करतोय ते पाहून तर त्याला 'Husband of the year' असा पुरस्कार देऊन सन्मानित करायला, पाहिजे, असंही काही जणांनी आणि विशेषत: महिलांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या देशातला याचा अंदाज येत नाही. पण व्हिडिओ मात्र चांगलाच गाजतो आहे. आता तो तिचा नवरा आहे की बॉयफ्रेंड आहे, हे देखील स्पष्ट नाही. पण कॅप्शनमध्ये जे दिलं आहे, त्यावरून तो तिचा नवराच असावा, असं मानूया.
व्हिडिओमध्ये नेमकं आहे काय?कोणत्या तरी खेळाची मॅच सुरू आहे. तो नवरा आणि त्याची बायको दोघेही स्टेडियमवर बसलेले आहेत. स्टेडियम गर्दीने अगदी खचाखच भरलेलं आहे. थोड्या थोड्या वेळाने मेकअपला टचअप करण्याची सवय अनेक जणींना असते.
तशीच सवय त्या बायकोलाही असावी. त्यामुळे ती तिचे आयलायनर, आयब्रो यांना टचअप करत आहे आणि तिचा नवरा मॅच बघायचं सोडून तिची मदत करतो आहे. त्याने आरशाप्रमाणे मोबाईल त्याच्या हातात पकडला आहे. आणि त्या मोबाईलमध्ये पाहून बायकाेचा अगदी निवांत मेकअप सुरू आहे. हा मजेशीर व्हिडिओ प्रत्येक नवरा- बायकोने एकदा बघायलाच हवा..