Join us  

घर लहान असलं तरी कमी जागेत पसारा न दिसता जास्त वस्तू ठेवण्याची पाहा ट्रिक, व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 4:43 PM

Viral Video : कमी जागेत जास्तीत जास्त सामान कसा ठेवायचा हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.

लोकांना त्यांच्या घरात अनेक बदल करावेसे वाटतात. (Home Tips) पण हे बदल कसे करायचे, याची कोणतीही माहिती त्यांच्याकडे नसते. काही घरे  सामानानुसार छोटी असतात, तर काही घरांमध्ये लोकांना मोकळी जागा लागते. काही ठिकाणी घरात गरजेपुरताच सामान ठेवावा लागतो कारण घरात पुरेशी जागा नसते. (Innovative ideas for more space in small houses) तर काही ठिकाणी घरं मोठी असूनही फर्निचरचा आकार मोठा असल्यानं घर लहान वाटतं, जागा कमी पडते. तुम्हालाही अशी समस्या उद्भवत असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या सगळ्या समस्या  दूर होतील. (Innovative ideas for more space in small houses must try architecture in your home)

कमी जागेत जास्तीत जास्त सामान कसा ठेवायचा हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओमध्ये अशी वास्तुकला दाखवण्यात आली आहे. जी पाहून तुमचेही मन प्रसन्न होईल. अशा नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे तुमचे घर अधिक व्यवस्थित होण्यास मदत होऊ शकते.

हा व्हिडिओ पाहून अनेक लोक प्रभावित होत आहेत. खरंतर तुमचे घर अधिक व्यवस्थित बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये काही युक्त्या दाखवल्या आहेत. एक गोष्ट अनेक प्रकारे कशी काम करत आहे हे व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते. शेल्फ देखील शिडीसारखे कसे कार्य करू शकते? हे पाहण्यासठी सगळ्यात आधी तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ जरूर पाहा.

गर्लफ्रेंडशी कॉलवर बोलताना एक एअरपॉड बायकोच्या कानातच राहीला; अन् मग.., पाहा व्हिडिओ

एक व्यक्ती बसण्याच्या कोनातून पाच स्टूल काढते आणि जेवणाचे टेबल सेट करते. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. असा एक सोफा बेडमध्ये बदलला आहे. त्याचप्रमाणे, ड्रॉवर टेबल काही सेकंदात बेडमध्ये आणि नंतर स्टडी टेबलमध्ये बदलते. एक गोष्ट तीन गोष्टी करू शकते. या सर्व युक्त्या तुम्ही तुमच्या घरातही वापरू शकता. बेडचा अनेक वेळा वापर कसा करता येतो हे देखील पुढे दाखवले आहे.

नुकतंच लग्न झालेल्या तरुणी गुगलवर काय सर्च करतात? डेटाच सांगतोय सर्च की कहानी..

आतापर्यंत 2.5 दशलक्षाहून अधिक लोकांनी  हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओत फक्त 31 सेकंदात अनेक युक्त्या दाखवल्या जातात. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एवढेच नाही तर एक लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया