Lokmat Sakhi >Social Viral > 'कही आग लगे लग जाये...', म्हणत नृत्य करणाऱ्या जपानी तरुणींवर नेटीझन्स फिदा, बघा त्यांचा कमाल व्हिडिओ

'कही आग लगे लग जाये...', म्हणत नृत्य करणाऱ्या जपानी तरुणींवर नेटीझन्स फिदा, बघा त्यांचा कमाल व्हिडिओ

Viral Video Japani Women: छानपैकी पंजाबी ड्रेस घालून बघा कसा बहारदार डान्स केला आहे या दोन जपानी तरुणींनी.... त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social viral) चांगलाच ट्रेंडिंग आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 05:12 PM2022-08-25T17:12:48+5:302022-08-25T17:13:58+5:30

Viral Video Japani Women: छानपैकी पंजाबी ड्रेस घालून बघा कसा बहारदार डान्स केला आहे या दोन जपानी तरुणींनी.... त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social viral) चांगलाच ट्रेंडिंग आहे.

Viral video, Japani women dancing on bollywood song with Indian dressing, Must watch their beautiful dance | 'कही आग लगे लग जाये...', म्हणत नृत्य करणाऱ्या जपानी तरुणींवर नेटीझन्स फिदा, बघा त्यांचा कमाल व्हिडिओ

'कही आग लगे लग जाये...', म्हणत नृत्य करणाऱ्या जपानी तरुणींवर नेटीझन्स फिदा, बघा त्यांचा कमाल व्हिडिओ

Highlightsएवढ्या नजाकतीने त्या नृत्य करत आहेत की त्यांचा डान्स खरोखरंच अगदी देखणा आणि बघण्यासारखा झाला आहे. 

भारतीय चित्रपट आणि त्यातली गाणी (bollywood music) जगभरातल्या लोकांना आवडतात. गाण्याचा अर्थ समजत नसला तरी हिंदी, पंजाबी गाण्यांच्या बिट्सवर जगभरातले लोक थिरकतात आणि भारतीय संगीत (bollywood song) मनापासून एन्जॉय करतात. सध्या सोशल मिडियावर तर आपण असे अनेक व्हिडिओ बघतो, ज्यामध्ये बॉलीवूडचं एखादं गाणं सुरु असतं आणि त्यावर परदेशी नागरिक मस्त नृत्य करत असतात. सध्या गाजत असणारा जपानी तरुणींचा (Viral Video Japani Women) व्हिडिओही तसाच आहे. 

 

mayojapan या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दोन जपानी तरुणी अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या 'ताल' चित्रपटातील (Movie- Taal) 'कही आग लगे लग जाये...' या गीतावर अतिशय सुंदर नृत्य करताना दिसत आहेत.

कांदा अगदी बारीक, दाणेदार चिरण्यासाठी ही बघा सोपी ट्रिक, झटपट चिरून होतील कांदे

विशेष म्हणजे या नृत्यासाठी दोघींनीही भारतीय वेशभुषा केली आहे. पिवळ्या रंगाचे अनारकली स्टाईल पंजाबी ड्रेस आणि त्यावर आकाशी रंगाची ओढणी असं त्यांचं ड्रेसिंग आहे. याशिवाय कपाळावर टिकली आणि एकेका हातात घातलेलं ब्रेसलेट त्यांना अधिक आकर्षक लूक देत आहे. एवढ्या नजाकतीने त्या नृत्य करत आहेत की त्यांचा डान्स खरोखरंच अगदी देखणा आणि बघण्यासारखा झाला आहे. 

 

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या दोघी जणी बहिणी असाव्यात, असं त्यांच्या व्हिडिओला आलेल्या काही कमेंटवरून दिसून येत आहे.

तब्बल १ किलो वजनाचं सुरत स्पेशल रिमझिम सॅण्डविच! बघा जंबो सॅण्डविचचा व्हायरल व्हिडिओ

या दोघींनाही भारतीय गाण्यांवर नृत्य करणे आवडत असावे. कारण इन्स्टाग्रामवर त्यांनी शेअर केलेले बरेचसे रिल्स हे भारतीय गाण्यांवर केलेल्या नृत्याचेच आहेत. काही गाण्यांमध्ये तर त्यांनी साडीही घातली आहे. केवळ बॉलीवूडचे हिंदी गाणेच त्यांना आवडतात, असं नाही. तर त्यांनी वेगवेगळ्या भारतीय भाषांवरही अतिशय सुंदर नृत्य केले आहे. 

 

Web Title: Viral video, Japani women dancing on bollywood song with Indian dressing, Must watch their beautiful dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.