Join us  

व्हिएतनामच्या फूड ब्लॉगरने पहिल्यांदाच खाल्ली पाणीपुरी! पाहा पाणीपुरी तोंडात ठेवताच कसा झाला चेहरा..व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2022 4:16 PM

Eating Panipuri for First Time: पाणीपुरी!! आहाहा, हा शब्द ऐकला- वाचला तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. म्हणूनच तर व्हिएतनामच्या एका फूड ब्लॉगरने ती आवडीने खाल्ली आणि खाताच....

ठळक मुद्देप्रत्येकवेळी त्याने दिलेल्या रिॲक्शन खूपच मजेदार हाेत्या.त्यामुळेच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

स्वस्तात मस्त मिळणारा एक चटकदार पदार्थ म्हणजे पाणीपुरी. चटपटीत, चविष्ट आणि तोंडाला चव आणणारं असं काही खायचं असेल आणि ते ही अगदी कमी पैशात.. तर एक उत्तम पदार्थ सगळ्यांनाच आठवतो आणि तो म्हणजे पाणीपुरी (panipuri lovers). अगदी पन्नास रुपयांत पोटभर पाणीपुरी खाण्याचं समाधान मिळतं. बरं उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असा कोणताही ऋतू असला तरी पाणीपुरी मिळते आणि तिचा यथेच्छ आस्वादही घेता येतो. असाच पाणीपुरीचा आस्वाद एका व्हिएतनामी फूड ब्लॉगरला (Vietnamese food blogger) घ्यावा वाटला. 

 

qqquang या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. क्वाँग ट्रॅन असं या फूड ब्लॉगरचं नाव आहे.

स्वयंपाक घरातले फक्त ३ पदार्थ वापरा, १५ दिवसात केस गळण्याचं प्रमाण होईल कमी; सुधारेल केसांचा पोत

PANI PURI 🇮🇳 Have you ever tried this before? असं कॅप्शन त्याने व्हिडिओला दिलं आहे. त्याचा हा व्हिडिओ खरोखरंच मजेशीर असून सोशल मिडियावर तो चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये क्वाँगने पाणीपुरी कशी बनवतात किंवा त्यात काय काय पदार्थ असतात, याची माहितीही नेटिझन्सला दिली आहे.

 

एकेका पदार्थाचं नाव सांगून तो पाणीपुरी भरतो आणि नंतर तोंडात टाकतो. अशा ४ ते ५ पुऱ्या त्याने खाल्ल्या आणि प्रत्येकवेळी वेगळीच रिॲक्शन दिली. पहिली पुरी खाल्ल्यानंतर त्याला जरा ठसका आल्यासारखं जाणवलं.

आलिया भट म्हणते प्रत्येकवेळी बेस्ट असण्याची अपेक्षा कायम बायकांकडून का? उणीवा असल्याच तर..

तसंही ज्या लोकांना नेहमीच पाणीपुरी खाण्याची सवय असते, त्यांनाही तेज असणारी पाणीपुरी तोंडात टाकल्यावर थोडा ठसका येतोच. पण त्यानंतरही प्रत्येकवेळी त्याने दिलेल्या रिॲक्शन खूपच मजेदार हाेत्या. कधी एकदम तोंड वेडंवाकडं केलं तर कधी आता त्याला उलटी येतेय की काय, असं बघणाऱ्याला वाटतं.. एकंदरीतच त्याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन बघणे खूपच गंमतशीर असून, त्यामुळेच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नविएतनाम