Lokmat Sakhi >Social Viral > पाहिलाय असा जादुचा ड्रेस? उन्हात गेलं की एकदम बदलतो रंग, दिसतो कमाल.. बघा व्हायरल व्हिडिओ

पाहिलाय असा जादुचा ड्रेस? उन्हात गेलं की एकदम बदलतो रंग, दिसतो कमाल.. बघा व्हायरल व्हिडिओ

Viral Video of Magical Dress: उन्हात गेलं की चक्क या ड्रेसचा रंगच बदलतो.. नेमकी आहे काय या ड्रेसची जादू? बघा या जादुई ड्रेसचा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 06:32 PM2022-10-29T18:32:55+5:302022-10-29T18:33:55+5:30

Viral Video of Magical Dress: उन्हात गेलं की चक्क या ड्रेसचा रंगच बदलतो.. नेमकी आहे काय या ड्रेसची जादू? बघा या जादुई ड्रेसचा व्हायरल व्हिडिओ

Viral Video: Magical dress that changes its colour in sun | पाहिलाय असा जादुचा ड्रेस? उन्हात गेलं की एकदम बदलतो रंग, दिसतो कमाल.. बघा व्हायरल व्हिडिओ

पाहिलाय असा जादुचा ड्रेस? उन्हात गेलं की एकदम बदलतो रंग, दिसतो कमाल.. बघा व्हायरल व्हिडिओ

Highlights या ड्रेसचा जो कपडा आहे त्यातील केमिकल्सची सुर्यप्रकाशातील युव्ही किरणांशी रिॲक्शन होते आणि मग कपड्याचा रंग बदलतो. 

धूप- छाव रंगाच्या साड्या किंवा कपडे आपण नेहमीच पाहत असतो. उन्हात गेलं की या कपड्यांच्या रंगाची शेड वेगळी दिसते आणि सावलीत वेगळी दिसते. पण या दोन्ही शेडमध्ये असा खूप काही फरक नसतो. पण सध्या व्हायरल झालेल्या जादुई ड्रेसची (Magical dress) मात्र गोष्टच वेगळी आहे. सावलीत असताना या ड्रेसचा रंग वेगळा असतो आणि उन्हात गेलं की एकदम वेगळ्या रंगाचा ड्रेस बघायला मिळतो.. या व्हिडिओने (Viral Video) सध्या नेटकरींना अचंबित केले असून अनेक तरुणींनी तर अशा पद्धतीचा ड्रेस कुठे मिळेल, याचा गुगल सर्च सुरू केला आहे.

 

izzipoopi या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ही तरुणी न्यूयॉर्कची आहे, असे तिच्या काही इन्स्टाग्राम पोस्टवरून दिसून येते. व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की सुरुवातीला ती एका खोलीमध्ये उभी आहे.

गुळाचे रंग वेगवेगळे का असतात? कोणत्या रंगाचा गूळ तब्येतीसाठी चांगला? कोणता खाणे योग्य?

त्यावेळी तिच्या ड्रेसचा रंग पांढरा आहे. त्यानंतर ती खोलीचा दरवाजा उघडून घराबाहेर येते आणि उन्हात जाते. ती उन्हात जाताच तिचा ड्रेस पुर्णपणे बेबी पिंक रंगाचा होऊन जातो. सावलीत आल्यावर ड्रेस पुन्हा पांढरा दिसू लागतो, तर उन्हात गेल्यावर पुन्हा तो गुलाबी रंगाचा दिसायला लागतो. 

घेणार का चॅलेंज? ८ किलोचा बाहुबली सामोसा खा आणि ५१ हजारांचं बक्षिस मिळवा, व्हिडिओ व्हायरल

सहा दिवसांपुर्वीच शेअर झालेल्या या व्हिडिओला तब्बल २५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. PH5 या ब्रॅण्डचा हा ड्रेस आहे. या ड्रेसचा जो कपडा आहे त्यातील केमिकल्सची सुर्यप्रकाशातील युव्ही किरणांशी रिॲक्शन होते आणि मग कपड्याचा रंग बदलतो. 
 

Web Title: Viral Video: Magical dress that changes its colour in sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.