Lokmat Sakhi >Social Viral > आई ती आईच! पर्यटकांच्या दिशेनं जाणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला आईनं लगेच मागे खेचलं, पाहा व्हिडिओ

आई ती आईच! पर्यटकांच्या दिशेनं जाणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला आईनं लगेच मागे खेचलं, पाहा व्हिडिओ

Viral Video Mother Elephant : आई आपल्या मुलांना प्रत्येक धोक्यापासून वाचवते आणि त्यांना नेहमी सावध करू इच्छिते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 08:23 PM2022-09-05T20:23:16+5:302022-09-05T20:35:39+5:30

Viral Video Mother Elephant : आई आपल्या मुलांना प्रत्येक धोक्यापासून वाचवते आणि त्यांना नेहमी सावध करू इच्छिते.

Viral Video Mother Elephant : Viral video mother elephant shields baby with mighty trunk to protect it from tourists video | आई ती आईच! पर्यटकांच्या दिशेनं जाणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला आईनं लगेच मागे खेचलं, पाहा व्हिडिओ

आई ती आईच! पर्यटकांच्या दिशेनं जाणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला आईनं लगेच मागे खेचलं, पाहा व्हिडिओ

हत्ती आणि माणसाचं नातं आतापर्यंत तुम्ही अनेक चित्रपट आणि कथांमधून पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यावरून असे वाटते की जणू काही प्राण्यांना माणूस किती चपळ असू शकतो याची जाणीव आहे. या कारणास्तव, या व्हिडिओमध्ये, एक मादी हत्ती आपल्या मुलांना माणसांकडे जाण्यापासून थांबवत आहे (mother elephant stop baby from going to humans).

@buitengebieden या ट्विटर अकाउंटवर प्राण्यांचे आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. अलीकडेच, या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये एक मादी हत्ती आपल्या मुलाला माणसांजवळ येऊ देत नाही. आई आपल्या मुलांना प्रत्येक धोक्यापासून वाचवते आणि त्यांना नेहमी सावध करू इच्छिते. माणसांप्रमाणेच ही आईसुद्धा आपल्या मुलांना माणसांच्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी सज्ज झालेली दिसते.

व्हिडिओमध्ये एक हत्ती आणि तिचे बाळ जंगलाच्या मध्यातून एकत्र बाहेर येताना दिसत आहे. रस्त्यावर आल्यानंतर त्याचे लक्ष काही लोकांकडे जाते जे तिथे उभे राहून त्याचा व्हिडिओ बनवत आहेत. या हत्तीचे बाळ खेळकर आहे, धावणाऱ्या माणसांकडे धावते पण हत्तीची आई त्याला त्याच्या सोंडेने थांबवते आणि नंतर मागे वळवते. मागे वळताच ती मुलालाही सोबत घेऊन तेथून निघून जाते.

१०० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचं अनोखं सिक्रेट; निरोगी दिर्घायुष्यासाठी फक्त या सवयी लावा

या व्हिडिओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट करून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की मादी हत्तीने हे केले कारण तिला माहित होते की मानव किती क्रूर असतात. एका व्यक्तीने गेंडा आणि त्याच्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते मूल माणसांकडे धावते आणि नंतर त्याच्या आईकडे धावते.

Web Title: Viral Video Mother Elephant : Viral video mother elephant shields baby with mighty trunk to protect it from tourists video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.