Join us  

८४ व्या वाढदिवसाला आजीबाईंना अशी मिळाली ट्रीट, आनंदानी पाणावले त्यांचे डोळे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2022 12:49 PM

Viral Video of 84 Year Old Women Celebrating her Birthday at her Favorite Restaurant : या महिलेला इतका आनंद होतो की तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात, हे क्षणही कॅमेरात कैद होतात.

ठळक मुद्देहा व्हिडिओ १५ दिवसांत १८ लाखहून अधिक जणांनी लाईक केला असून १ कोटी जणांनी तो पाहिला आहे. आजींना झालेला आनंद आपल्याला त्यांच्या डोळ्यातील अश्रूंच्या माध्यमातून अगदी सहज दिसतो.

वाढदिवस म्हणजे आपल्या प्रत्येकासाठीच खास असतो. मग ते लहान मूल असो किंवा अगदी वयस्कर आजी. पण आपल्या जन्माचा दिवस आपल्यासाठी एकदम स्पेशल असतो. यादिवशी नातेवाईक, मित्रमंडळी आणि सगळ्यांकडूनच आपल्याला मिळणाऱ्या शुभेच्छा, केक, गिफ्टस या सगळ्याचे प्रत्येकाला अप्रूप असते. आपला हा दिवस खास जावा यासाठी आपण आणि आपली प्रिय मंडळी काही ना काही विशेष प्लॅन करत असतात. काही वेळा हा प्लॅन आपल्याला माहित असतो तर काही वेळा आपल्याला सरप्राईज दिले जाते. अशावेळी आपल्याला होणारा आनंद गगनात मावेनासा असतो. आपले इतके प्रेमाने केले जाणारे कौतुक पाहून अनेकदा आपल्यालाही भरुन आल्यासारखे होते. नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक वयस्कर आजींच्या डोळ्यात पाणी येताना दिसते. 

(Image : Google)

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय वयस्कर आजी हॉटेलमध्ये काहीतरी खाताना दिसतात. याठिकाणी त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना एकत्रितरित्या शुभेच्छा देणाऱ्या महिलांचा आवाज मागून येत असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही महिला थोडीथोडकी नाही तर तब्बल ८४ वर्षांचे असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. आपले अशापद्धतीने कौतुक होताना पाहून या महिलेला इतका आनंद होतो की तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात, हे क्षणही कॅमेरात कैद होतात. Goodnewsdog या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ परदेशातील असल्याचे दिसते. विशेष म्हणजे ही आजी जेवत असलेले रेस्टॉरंट तिच्या आवडीचे असल्याचेही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. 

हा व्हिडिओ १५ दिवसांत १८ लाखहून अधिक जणांनी लाईक केला असून १ कोटी जणांनी तो पाहिला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियामुळे आणि या व्हिडिओमुळे माझी रात्र छान गेली. गॉड ब्लेस हर असे म्हणत अनेकांनी या आजीला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नाही तर अनेकांनी आपल्या आजीच्या वाढदिवसाचे, तिच्यासोबतच्या आठवणींचे अनुभव शेअर केले आहेत. या आजीचे नाव रोजी असून तिचे केसही पू्र्ण पांढरे झालेले आहेत. मात्र तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह आपल्याला या व्हिडिओमध्येही दिसून येतो.   

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया