लग्न समारंभ (wedding season) हा जसा आनंदाचा, उत्साहाचा सोहळा असतो, तसाच तो खूप भावनिक प्रसंगही असतो. खासकरून नवरी मुलगी, तिचं कुटूंब आणि तिच्या जवळच्या मंडळींसाठी तो एक अतिशय हळवा क्षण असतो. लग्नाचे विधी जसे सुरू होतात, तसेच अनेक भावनिक क्षण येतात आणि मग क्षणोक्षणी आई- वडिलांच्या, नवरीच्या, तिच्या भावंडांच्या डोळ्यात पाणी तरळते. आता सध्या सोशल मिडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो देखील थोडासा तसाच आहे. या व्हिडिओमध्ये नवरीने आणि तिच्या बहिणीने (beautiful dance by bride and her sister for their father) मिळून त्यांच्या वडिलांसाठी एक खास डान्स केला आणि तो डान्स नेटीझन्सला भारीच आवडला.
आजकाल भारतीय लग्नांमध्ये गाणे, नृत्य यांना खूप महत्त्व आले आहे. पुर्वी लग्नाच्यावेळी काही घरांमध्येच संगीत कार्यक्रम केला जायचा. पण आता मात्र काही मालिका आणि चित्रपट यामुळे जवळपास प्रत्येक लग्नातच एक छोटेखानी संगीत सोहळा होतो. ज्यात नवरा- नवरी यांच्यासकट त्यांचे जवळचे लोक नृत्य करून आनंद साजरा करतात. यात प्रामुख्याने लग्न, बिदाई अशी थीम घेऊनच कार्यक्रमाची आखणी केली जाते. या व्हिडिओमध्येही अशाच एका लग्नाचा संगीत सोहळा सुरू आहे. navikproductionsandanavis1201 या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जुलैमध्ये हा व्हिडिओ शेअर केलेला असला, तरी तो आताही चांगलाच व्हायरल होत आहे.
यात नवरी आणि तिची बहिण नृत्य करताना दिसते आहे आणि आजूबाजूला सगळी वऱ्हाडी मंडळी बसलेली आहेत. दोघींचे लेहेंगे आणि त्यांचे मेकअप तर कमाल आहेतच, पण त्याहीपेक्षा जी गोष्ट सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली आहे, ती म्हणजे त्या दोघींचा डान्स. आलिया भटच्या दिलबरो.... या अत्यंत इमोशनल गाण्यावर तसेच पापा केहेते है.. या गाण्यांवर त्यांनी बहारदार डान्स केला. सगळ्यात शेवटी तर नवरीच अतिशय इमोशनल झाली आणि धावत जाऊन तिच्या वडिलांच्या गळ्यात पडली.