जर आपण काही काळ डोळे बंद केले आणि आपल्याला आपल्या सभोवतालच्या गोष्टी दिसत नाहीत. काही वेळातच आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. काही बालकंही जन्मजात अंधत्वातून जात असतात. अशा परिस्थितीत नेत्र प्रत्यारोपण करून त्यांना पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी असेल. ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Viral video of a girl watch over 3.5 million user see here)
वास्तविक, या व्हिडिओमध्ये एका लहान मुलीच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यात आले आहे. त्यामुळे तिला दृष्टी मिळते. तिच्या चिमुकल्या डोळ्यांनी ती जेव्हा हे जग पहिल्यांदा पाहते (Eye Sight) तेव्हा तिची प्रतिक्रिया कशी असते, हे पाहण्यासारखे आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावनिक व्हाल. (Viral Video Of A Girl)
फिगेन नावाच्या युजरने 5 मिनिटे 1 सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी रुग्णालयात असून ती आईच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. जेव्हा तिच्या डोळ्याची पट्टी काढली जाते तेव्हा ती खूप रडायला लागते, पण नंतर जेव्हा डॉक्टरांनी तिला हळू हळू डोळे उघडण्यास सांगितले तेव्हा ती डोळे उघडते आणि ही सुंदर जग तिला पाहताच ती आश्चर्यचकित होते. त्याचवेळी आपल्या मुलीची दृष्टी आल्यानंतर तिची आई खूप भावूक होते आणि रडू लागते.
फक्त १० रूपयात स्वच्छ करा काळं पडलेलं गॅस बर्नर; १ उपाय, किचन दिसेल स्वच्छ
व्हायरल झाला चिमुरडीचा व्हिडिओ
या चिमुकलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच लाईक होत आहे. ट्विटरवर आतापर्यंत 3.5 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि 26.7 हजार लोकांनी तो लाईक केला आहे. त्याचवेळी, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटिझन्स देखील खूप भावूक झाले आणि एका वापरकर्त्याने 'मी लहान मुलासारखा रडणारा मोठा माणूस आहे' अशी कमेंट केली.
बर्थ डे सेलिब्रेशन चांगलंच अंगाशी आलं; कॅण्डल लावताच जे झालं ते पाहून चुकेल काळजाचा ठोका
त्याच वेळी, दुसर्या वापरकर्त्याने लिहिले की हे आश्चर्यकारक आहे. 'हे केवळ विज्ञानामुळेच शक्य झाले. एका अंध लहान मुलीला पाहण्याची संधी मिळाली आणि ती तिच्या आईला पाहू शकली.' यावर एका यूजरने लिहिले की, 'व्हिडिओ पाहताना माझ्या डोळ्यातून अश्रू कसे आले हे मला माहीत नाही. देव या मुलीचे कल्याण करो.'