लहान मुलं असतातच निरागस आणि गोड. त्यामुळे तर सोशल मिडियावर लहान मुलांचे व्हिडिओ व्हायरल होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यांच्यातली निरागसता, चेहऱ्यावरचे हसरे- खेळकर भाव बघणाऱ्याच्या मनाला एवढे स्पर्शून जातात की एकेक व्हिडिओ वारंवार बघितला जातो. सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेला हा या चिमुरड्या मुलाचा (little boy selling coffee) व्हिडिओही अगदी तसाच आहे. त्याचे ते गोड हास्य आणि हास्यासोबत गालावर उमटणारी ठसठशीत खळी (attractive dimple) यामुळे अनेक जण त्याच्या अक्षरश: प्रेमात पडले आहेत.
doug_barnard या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला तब्बल साडेपाच लाखांच्या आसपास लाईक्स मिळाले आहेत.
पाय सारखेच दुखतात, वेदना सहनच होत नाहीत? करिना कपूरची फिटनेस ट्रेनर सांगतेय ५ योगासनं, पायदुखी कमी
अवघ्या काही सेकंदांचा असणारा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या जबरदस्त व्हायरल झाला आहे. 'Iraqi kindness' असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं असून व्हिडिओला करण्यात आलेल्या इतर टॅगिंगवरून हा व्हिडिओ इराक येथील बसरा basra या भागातला असावा असं वाटतं. त्या ठिकाणचं हे एक पर्यटन स्थळ असून तिथे हा मुलगा कॉफी विकतो आहे.
ग्राहकाला कॉफी दिल्यावर तो गोड हसतो. त्याचं ते हसणं पाहून कॉफी पिणारा तर आणखीनच खुश होऊन जातो. कॉफीचे पैसे त्या मुलाला देऊ लागतो.
पण मुलगा सुरुवातीला पैसे घेण्यास नकार देतो. 'हे खास तुझ्यासाठी...' असं म्हणत जेव्हा तो ग्राहक त्याला बळजबरी पैसे देतो, तेव्हा तो मुलगा आणखीनच खुश होतो आणि अगदी गोड हसतो. त्याचं तेच तर हास्य नेटीझन्सला माेहित करत आहे. आता तो मुलगा का कॉफी विकतोय, एवढ्या लहान वयात त्याला का काम करावं लागतंय, इराकमध्ये बाल कामगार चालतात का? असे अनेक प्रश्नही या व्हिडिओबाबत विचारले जात आहेत.