Join us  

एवढ्याशा लेकराला किती तो अभ्यासाचा धाक, रडत- रडत आईला म्हणतोय.... बघा व्हायरल व्हिडिओ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 2:56 PM

Cute Little Boy and his Mother: अवघ्या तीन- साडेतीन वर्षांचा हा छोटासा मुलगा अभ्यास करून करून वैतागला आहे.. बघा त्याचा हा व्हिडिओ..

ठळक मुद्देअगदी काही सेकंदांचा हा व्हिडिओ. पण त्यावरून सध्याच्या पिढीला अभ्यासाचा किती ताण दिला जात आहे, हे लगेचच दिसून येतं.

सध्या अभ्यासाचा नको एवढा ताण अनेक पालक घेत आहेत आणि त्यांच्या मुलांनाही देत आहेत. सध्या स्पर्धा वाढली आहे, त्यामुळे त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या मुलांनीही धावावं, सगळ्यांपेक्षा अव्वल असावं, असं अनेक पालकांना वाटतं. पालक म्हणून ते त्यांच्या जागी बरोबर असले तरी आपल्या मुलांच्या क्षमतेपेक्षा जास्त आपण त्यांना ताणतोय का, त्यांचं बालपण हिरावून घेतोय का? याचा विचारही करायलाच हवा.. सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेला हा एक व्हिडिओही (Viral Video) त्याच प्रकारचा आहे. बघा अभ्यासाला घाबरून तो चिमुकला त्याच्या आईला काय म्हणतोय..( mother forcing little boy for studies)

सोशल मिडियावर ट्रेण्डिंग असणारा हा व्हिडिओ dwivedi.mini या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. साधारणपणे यात दिसणारा जो मुलगा आहे तो अडीच ते साडेतीन वर्षे या वयोगटातील असावा.

ब्लाऊज खूपच टाईट झालं? न उसवताही करता येईल परफेक्ट तुमच्या मापाचं- बघा भन्नाट आयडिया

त्याची आई त्याच्या बाजुला बसून त्याचा अभ्यास घेत आहे आणि त्याला एक.. दोन... लिहायला लावते आहे. मुलाला अभ्यास करायचा नाही, पण तो आईच्या धाकाने तिथे बसून राहिलेला आहे, हे त्याच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट दिसतं आहे. अशातच तो मुलगा लिहिता लिहिता रडू लागतो..

 

५ पर्यंत आकडे लिहिल्यावर त्याला पुढचं आठवेना.. पण आई मात्र लिहिण्याचा आग्रह करतेच आहे. आठवलं नाही तर आईचा मार खावा लागणार या विचाराने घाबरलेला तो चिमुरडा मग आईला 'मारो मत.. मारो मत..' असं म्हणत आर्जव करत आहे.

टेस्टी- हेल्दी मटार पुरी! मुलांना रोजच डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो ना.. करून बघा ही रेसिपी 

आईला खुश करण्यासाठी त्याने आईचा पापाही घेतला... असा अगदी काही सेकंदांचा हा व्हिडिओ. पण त्यावरून सध्याच्या पिढीला अभ्यासाचा किती ताण दिला जात आहे, हे लगेचच दिसून येतं. आईची शिकविण्याची पद्धत अतिशय चुकीची असून मुलांना धाक दाखवून नाही तर प्रेमाने अभ्यासाला बसवलं पाहिजे, असंही काही नेटिझन्सनी कमेंटमध्ये लिहिलं आहे.

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालहान मुलं