हल्ली ऑनलाईन जमान्याचे प्रस्थ वाढत असल्याने क्यु आर कोड जवळपास आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा झाला आहे. कोड स्कॅन करून आपल्याला हवे ते व्यवहार करणे, आता नित्याचेच आहे. सोशल मिडियावरील काही व्हिडिओ (viral video) पाहण्यासाठीही त्याचा एक विशेष क्यु आर कोड ( QR Code rangoli) असतो, तो स्कॅन करून आपण व्हिडिओ बघू शकतो. आता याच क्यु आर कोडचा एक भन्नाट उपयोग एका कलाकाराने केला आहे. त्याने दिवाळीला घरासमोर क्यु आर कोड (Magical Rangoli having QR Code) असणारी रांगोळी काढली असून तो कोड चक्क स्कॅनदेखील होतो.
क्यू आर कोडच्या या रांगोळीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. rohannagpal26 या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला
सोहा अली खानचं जबरदस्त वर्कआऊट, फिटनेस टिकविण्यासाठी पहा करते किती अवघड व्यायाम
"Not your ordinary rangoli, wait till the end!" असं कॅप्शन दिलं आहे. खरोखरच ही काही सामान्य रांगोळी नाही. या रांगोळीची गंमत तो व्हिडिओ पुर्ण पाहिल्यानंतरच समजते यात वाद नाही. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास पाऊण लाख लाईक्स मिळाले आहेत.
व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की दिवाळीनिमित्त सगळीकडे फुलांच्या माळा, दिवे ठेवून सजावट केलेली आहे. मोबाईलद्वारे हे सगळं शुटिंग सुरू असताना एका घराच्या दारासमोर क्यू आर कोड असणारी रांगोळी दिसते.
थंडीच्या दिवसांत पौष्टिक ठरणारे ३ सुपरफूड, ते पदार्थ कोणते आणि कसे खायचे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
त्या रांगोळीच्या भोवतीही झेंडूची फुलं ठेवून सजावट केली आहे. मोबाईल या रांगोळीवर येताच तो क्यु आर कोड स्कॅन होतो आणि त्याच्यावर 'तारक मेहता का उलटा चष्मा' या प्रसिद्ध मालिकेतील एक सीन सुरू होतो. या सीनमध्ये जेठालाल गाणं गाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसतो. रांगोळी काढण्याची आणि दिवाळीच्या शुभेच्छा देण्याची ही अनोखी युक्ती नेटिझन्सला प्रचंड आवडली आहे.