Join us  

थरारक! एव्हढ्याश्या चिमुकलीवर वाघाचा जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून चुकेल काळजाचा ठोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 6:12 PM

Viral Video Of a Tiger & Little Girl : ही चिमुरडी जिथे होते त्या घड्याळाच्या मागे एक काच होती. त्यामुळे वाघ त्या मुलीपर्यंत पोहोचू शकला नाही.

इंटरनेटवर दररोज काहीतरी व्हायरल होत असते, ते पाहून आपलं कधी मनोरंजन होतं तर काही व्हिडिओ विचार करायला भाग पाडतात. पण सध्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. (Viral Video) वास्तविक, हा व्हायरल व्हिडिओ प्राणीसंग्रहालयाचा आहे, जिथे एका लहान मुलीला पाहून वाघाने हल्ला करण्यासाठी उडी घेतली. मात्र मध्येच ही काचेची भिंत आल्याने मुलीचा जीव वाचला. (Viral video of a tiger and little girl gives you goosebumps know more details on video)

फिगेन नावाच्या वापरकर्त्याने ट्विटरवर हा धक्कादायक व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले 'व्वा आणि खूप दुःखी!' वास्तविक, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी आरामात उभी आहे, तर तिच्या मागे दोन वाघ उभे आहेत. दोघांच्या मध्ये एक छोटा तलाव दिसतो. मुलीला पाहताच वाघाने अशी उडी मारली की सगळे सावध झाले.

कंबर, गुडघे खूप दुखतात? खा भरपूर कॅल्शियम असलेले ६ शाकाहारी पदार्थ, हाडं कायम राहतील बळकट

ही चिमुरडी जिथे होते त्या घड्याळाच्या मागे एक काच होती. त्यामुळे वाघ त्या मुलीपर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्याने उडी मारून यू-टर्न मारला. मात्र, नीट पाहिल्यास या प्राण्याने  शिकार पकडण्यासाठी उडी मारल्याचे दिसून येते. मात्र, हे पाहून मुलगी घाबरून तिथून पळून गेली.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल