Join us  

विमानतळावर ‘तिने’ हातानं भात खाल्ला तर तुमचं काय गेलं? व्हायरल व्हिडिओ, म्हणे हातानं जेवणं चूक.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 4:42 PM

Social Viral: आपल्याकडे बहुसंख्य लोक हातानेच भात खातात, मग तिच्याच भात खाण्याची एवढी चर्चा का होतेय? बघा व्हायरल व्हिडिओ (Viral video of a women eating rice with her hands on airport)...

ठळक मुद्देतुम्हाला काय वाटतं, हाताने भात खाणारीचं चुकतंय की गुपचूप व्हिडिओ घेणारीचं चुकतंय?

काही मोजके पदार्थ सोडले तर आपण भारतीय लोक हातानेच जेवण करतो. त्यातल्या त्यात भात तर असा एक पदार्थ आहे की तो बहुसंख्य लोक हातानेच खातात. एरवी आपण हॉटेलमध्ये गेल्यावर चमच्याने भात खात असू,

भारताच्या 'या' १० गोड पदार्थांची साऱ्या जगालाच भुरळ, बघा सर्वोत्कृष्ट डेझर्टमध्ये असणाऱ्या भारतीय स्वीटडीश

पण घरी मात्र पाच बोटांचा चमचा करून त्यानेच मस्तपैकी भात खाल्ला जातो.. आता 'तिने' बिचारीने सवयीनुसार एअरपोर्टवर हातानेच भात खायला सुरूवात केली तर त्यामध्ये दुसऱ्या कुणाला काही आक्षेप असण्याचं कारणच काय, असा प्रश्न 'तो' व्हिडिओ पाहून संतप्त झालेले नेटकरी करत आहेत... म्हणूनच एकदा तुम्हीही तो व्हिडिओ पाहा आणि खरच तिचं काही चुकलंय का ते सांगा...(Viral video of a women eating rice with her hands on airport)

 

JusB या सोशल मिडिया हॅण्डलवरून एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ जिने शेअर केला आहे, ती अमेरिकन महिला आहे, असं तिच्या अकाउंटवरून दिसत आहे. या व्हिडिओला तिने "Y'all, why this lady sat next to me eating with her damn hands? In a nasty airport" असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडिओमध्ये असं दिसतंय की एक भारतीय महिला एअरपोर्टवर जेवत असून ती हाताने भात खात आहे. तिचं हाताने भात खाणं व्हिडिओ घेणाऱ्या महिलेला किळसवाणं वाटत असून तिने गुपचूप त्या जेवणाऱ्या महिलेचा व्हिडिओ घेऊन सोशल मिडियावर शेअर केला आहे.

 

हा व्हिडिओ आणि तिने शेअर केलेली पोस्ट वाचून अनेक लोक भयानक खवळले असून ती तिच्या हाताने, तिच्या ताटातला भात खाते आहे, तर त्यात तुम्हाला काय हरकत आहे, तुम्हाला ते चुकीचं वाटतं तर तिचा असा गुपचूप व्हिडिओ घेण्यापेक्षा तुम्ही तिथून उठा आणि दुसरीकडे जाऊन बसा, असं काही जणांनी सुचवलं आहे.

न्यासा देवगणच्या चमचमत्या लेहेंग्याची भारीच चर्चा, तिच्या या घागऱ्याची किंमत ऐकूनच....

पिझ्झा, बर्गर असे विदेशी पदार्थ हाताने खाणं तुम्हाला चालत असेल तर मग भातालाच का नाव ठेवता, असा सवालही तिला करण्यात आला आहे. तर काही जणांनी ही आमची संस्कृती असून ती महिला काहीही चुकीचं करत नाहीये, असंही तिला अनेकांनी ठणकावून सांगितलं आहे. तुम्हाला काय वाटतं, हाताने भात खाणारीचं चुकतंय की गुपचूप व्हिडिओ घेणारीचं चुकतंय?

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्नविमानतळ