डान्स ही अशी गोष्ट आहे की गाणं लागायचा अवकाश पावलं थिरकायला लागतातच. काहींना डान्स करणे इतके आवडते की त्यांना स्थळ, काळ, वेळेचे भानच राहत नाही. डान्स करण्यात हे लोक इतके दंग होतात की आपल्या आजुबाजूला कोण आहे याचेही त्यांना भान राहत नाही. कधी सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी तर कधी आणखी काही कारणासाठी लोक भर गर्दीत काही व्हिडिओ शूट करतात. सोशल मीडियामुळे हे व्हिडिओ काही तासांत जगभरात पसरतात. इतकेच नाही तर हे व्हिडिओ इतके व्हायरल होतात की आपण त्याची कल्पनाही केलेली नसते (Viral Video).
new york city is not real LMAOO pic.twitter.com/DtHa28hnty
— kira (@kirawontmiss) June 19, 2022
नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे एक तरुणी अचानक रस्त्यात डान्स करत गर्दीतून पुढे येते. तिचा डान्स इतका ढासू आहे की याठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे तिच्याकडे लक्ष जातेच. लोक हातात मोबाइल घेऊन फोटो काढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण ते या तरुणीचा फोटो काढत नसून याठिकाणी होत असलेल्या सूर्योदय ते कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. या मुलीसोबत दोन कॅमेरामन असून ते तिच्या डान्सचे शूटींग करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे ही तरुणी करत असलेल्या डान्समध्ये काहीच खास नाही. काळ्या रंगाचे कपडे घालून ती विनाकारण अंगविक्षेप करताना दिसत आहे. मग अशाप्रकारचा स्टंट का करावा असा प्रश्नही उपस्थित होतो.
This is what they’re seeing pic.twitter.com/PuqRll8VMd
— (@Jari2Fly) June 20, 2022
पलिकडे असलेला सूर्यास्ताचा नजारा अतिशय सुंदर असल्याचे व्हिडिओच्या काही भागात दिसत आहे. केशरी रंगाचा सूर्याचा संपूर्ण गोळा याठिकाणी दिसत असल्याने भर रस्त्यात थांबून हा नजारा टिपण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. आकाशात केशरी रंगाची अतिशय सुंदर अशी झाक पसरल्याचे दिसत आहे. आजुबाजूला असणाऱ्या काचेच्या इमारतींवर सूर्याचे प्रतिबिंब पडल्याने हे दृश्य आणखीनच खुलले आहे. मात्र या मुलीच्या डान्सहा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास ११ लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर येथे एका भारतीय तरुणीने असाच डान्स केला होता आणि तिचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.