Join us  

ऐश्वर्या नारकरांनी दिवाळीसाठी सजवलं घर! बघा घरातल्या छोट्याशा कोपऱ्याला कसा दिला मस्त लूक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 12:55 PM

Viral Video Of Actress Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकर यांनी दिवाळीसाठी कशा पद्धतीने घर सजवलं याविषयी माहिती सांगणारा एक छोटासा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ठळक मुद्देआपल्या प्रत्येकाच्याच घरात अशी एखादी खिडकी किंवा असा एखादा कोपरा असतो, जो खरंतर घरात खूप मोक्याच्या जागी असतो, पण त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते आपल्या लक्षात येत नाही.

प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मिडियावर बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असतात. इन्स्टाग्रामवर त्या नेहमीच वेगवेगळ्या रिल्स शेअर करत असतात. कधी कधी घर सजविण्याचे, गार्डनिंग विषयीचे, योगासनांचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करतात. यामुळे त्यांच्या चाहत्यांना नेहमीच त्यांच्याशी कनेक्ट होण्याची संधी मिळते. आता त्यांनी नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून  यामध्ये त्यांनी त्यांच्या घरातला एक छोटासा कोपरा खूप छान पद्धतीने सजवला आहे. छोट्याछोट्या आकर्षक वस्तू वापरूनही घर किती छान सजवता येतं, हेच जणू त्यांनी त्या व्हिडिओतून दाखवून दिलं आहे..(Diwali Celebration 2024)

 

ऐश्वर्या नारकर यांनी कसं सजवलं घर...

आपल्या प्रत्येकाच्याच घरात अशी एखादी खिडकी किंवा असा एखादा कोपरा असतो, जो खरंतर घरात खूप मोक्याच्या जागी असतो, पण त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते आपल्या लक्षात येत नाही. यासाठी तुम्हाला काही टिप्स पाहिजे असतील तर ऐश्वर्या यांनी शेअर केलेला व्हिडिओ नक्कीच पाहा..

वजन कमी करण्यासाठी महिलांनी खावे 'हे' पदार्थ, पण तेच पुरुषांनी खाल्ले तर..? बघा मजेशीर संशोधन

यामध्ये त्यांनी घराच्या एका कोपऱ्यात एक सीटआऊट ठेवले आहे. त्यावर त्यांनी आकर्षक छान चादर टाकली आहे. आणि त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या छान उशा ठेवल्या आहेत. त्या सीटआऊटच्या बाजुला एक छानसा वाढलेला मनीप्लांट ठेवला आहे. फक्त एवढंच केलं तरी त्या तेवढ्या जागेला खूप आकर्षक रूप आलं आहे..

 

घरातला छोटासा कोपरा सजविण्यासाठी टिप्स..

तुम्हालाही घरातल्या एखाद्या छोट्याशा जागी अशीच काहीशी सजावट करायची असेल तर तुम्ही त्यासाठी वेगवेगळ्या कुंड्यांचा नक्कीच वापर करू शकता. सिरॅमिकच्या अनेक कुंड्या वेगवेगळ्या आकारात मिळतात. व्हर्टिकल गार्डनिंगसाठी असणारे स्टॅण्ड घेऊन त्यावर कुंड्या ठेवून तुम्ही एखादा कोपरा छान हिरवागार सजवू शकता..

Diwali Vibes: जुन्या भरजरी साड्या वापरून सजवा घर! घराला छान 'फेस्टिव्ह लूक' देण्यासाठी ६ टिप्स..

भारतीय बैठक करूनही घरातली एखादी जागा छान सजवता येते. त्यासाठी अगदी कमी उंचीची बैठक तयार करा. किंवा घरातल्याच गाद्या एकमेकांवर ठेवून बैठक केली तरी चालते. त्यावर छान आकर्षक चादर आणि वेगवेगळ्या रंगाच्या उशा ठेवल्या की छान रिलॅक्स जागा तयार होईल.

 

टॅग्स :सोशल व्हायरलदिवाळी 2024ऐश्वर्या नारकरगृह सजावट