अभिनेत्री जुही परमार सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. प्रत्येक सणाच्या अनुषंगाने ती एखादी पोस्ट तरी सोशल मीडियावर शेअर करतेच. त्यानुसार आता गणेशोत्सवासाठीही तिने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती आणि तिची लेक समायरा या दोघी जणी एक छानसा इकोफ्रेंडली बाप्पा तयार करत आहेत. तिचा हा गणपती बनविण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून यामध्ये गणपतीची मुर्ती साकारण्याची अतिशय सोपी पद्धत तिने दाखवली आहे. (Viral video of actress Juhi Parmar of making Ganapati Bappa)
हा व्हिडिओ शेअर करताना जुही म्हणते की तिच्या लेकीला समायराला गणपती बनवायला खूप आवडतं. त्यामुळे त्या दोघी दरवर्षी घरीच गणपती बनवतात. त्यानुसार तिने यावर्षी थेट कणकेपासून गणपती बनविण्याचा प्रयोग केला.
पाकिस्तानी तरुणीला ‘मिस युनिव्हर्स पाकिस्तान’चा मुकूट, मात्र देशात अनेकजण चिडले कारण..
गणपती बनविण्याची तिची पद्धत अतिशय सोपी असून तुम्ही ती तुमच्या मुलांनाही दाखवू शकता आणि त्यांच्याकडून तसा गणपती करून घेऊ शकता. गणपती बनवायला अगदी मातीच पाहिजे किंवा बाजारात मिळणारा क्ले हवाच, असं काही नसतं. थोडा विचार केला तर घरातल्या वस्तूंपासूनही उत्तम गणराय साकारता येतो, हेच जुहीने तिच्या लेकीला आणि आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे.
कसा तयार केला गणपती?
गणपती तयार करण्यासाठी जुहीने साधारण पुरीएवढा गोल तयार केला आणि तो पाटावर ठेवला. त्यावर एक बॉलप्रमाणे गोल केला आणि चिकटवला. हे झाले गणपतीचे पोट.
पावसाळ्यात कुंडीतली माती शेवाळली- हिरवीनिळी झाली? लवकर करा ३ गोष्टी, नाहीतर झाडं जातील कोमेजून
आता त्या पोटाच्या दोन्ही बाजूंनी पाय जोडले. त्या पोटावर पुन्हा एक छोटा गोल ठेवला. आणि त्याला सोंड जोडली. त्यानंतर थोडी थोडी कणिक घेऊन गणपतीला टोप, कान आणि हात केले. गणपतीच्या टोपाला रंग दिला आणि तयार झाला सुबक गणराय.... करून बघा एकदा