प्रत्येक लव्हस्टोरी जशी वेगळी असते, तशी प्रत्येक लग्नाची स्टोरीही वेगळीच असते... मग ते लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज.. कोणत्या ना कोणत्या कारणावरून प्रत्येक लग्न हमखास गाजतंच.. आता हेच बघा ना, इथे या लग्नात एक भलताच गोंधळ उडाला.. नवरीने नवरदेवासमोर अशा अटी ठेवल्या की त्या ऐकूणच सगळे वऱ्हाडी आश्चर्यचकीत झाले आणि नंतर मात्र चांगलाच हशा पिकला...
आजकाल लग्नापुर्वी नवरा- नवरी यांच्यामध्ये काही बाबतीत करार होण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. छोट्या शहरात हा बदल अजून दिसत नसला, तरी बऱ्याच ठिकाणी आता हा बदल स्वीकारला जात आहे. सोशल मिडियावर व्हायरल (viral video) झालेल्या या लग्नाची गोष्टही याच वळणाने जाणारी.. तर त्याचं झालं असं की जेव्हा सप्तपदीची वेळ आली, तेव्हा नवरीने नवऱ्यासोबत सप्तपदी चालण्यास नकार दिला. सप्तपदी म्हणजे एका अर्थाने आपल्याकडे सात वचन मानले जातात. यामध्ये नवरा- नवरी दोघेही एकमेकांना त्यांच्या भावी संसाराविषयी वचन देत असतात...
अशीच काही वचने या नवरीने बॉण्ड पेपरवर (bond paper) लिहून आणली होती. सप्तपदीची ७ वचनं तर आपण पाळूच, पण त्यासोबत तु माझ्याशी हे काही इतर करारही करावेत, असा या नवरीचा आग्रहं होता.. सुरुवातीला नवरीला नेमकी कोणती वचनं पाहिजे आहेत, असं वाटून सगळेच गांगरले होते. पण जशी वचनांची यादी कळली, तसा मंडपात एकच हशा पिकला.. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या makeupbybhumikasaj या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आला आहे.नवरीने नवऱ्याकडून घेतलेली वचनं..- नवऱ्याने तिच्यासोबत रोज करोके नाईट्स करावीत.- ती ज्या वेबसिरिज बघते, त्याचे कोणतेही स्पॉइलर्स तिला सांगू नयेत.- दिवसातून तीन वेळा तिला आय लव्ह यू म्हणायचं..- तिच्याशिवाय कधीही बीबीसी खायचं नाही. - तिला जर काही खोटं सांगायचं असेल, तर त्यासाठी तिची कधीही खोटी शपथ घ्यायची नाही..