आपल्याला कोणी चिडवलं की आपल्याला खूप राग येतो. एका मर्यादेपर्यंत आपण हे चिडवणं ऐकून घेतो पण नंतर ते आपल्याला सहन झालं नाही की मात्र आपण त्या व्यक्तीला काहीबाही बोलतो किंवा प्रसंगी आपला हातही उठतो. आपल्याप्रमाणेच प्राण्यांनाही भावना असतात आणि त्यांनाही राग येऊ शकतो. राग आला की प्राणी काय करु शकतात याची मात्र आपल्याला अनेकदा ल्पना नसते. कोणी काही वेगळे चाळे केले की आपण अगदी सहज माकडचाळे असं म्हणून त्याना हिणवतो. कारण माकड खरंच असे काही चाळे करतात की अनेकदा आपण त्याची कल्पनाही करु शकत नाही (Viral Video Of Angry Monkey Grab Girl Hair).
माकडचाळ्यांचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. यामध्ये एक मुलगी पिंजऱ्याच्या आत असलेल्या माकडाला चिडवण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला ते माकड त्यावर काही प्रतिक्रिया देत नाही. मात्र या मुलीने वारंवार असे केल्यानंतर मात्र हे माकड चिडते आणि जाळीच्या कुंपणातून हात बाहेर काढून या मुलीचे केस धरते. इतकेच नाही तर चिडलेले हे माकड केस इतक्या जोरात ओढते की ती मुलगी आणि तिच्या आजुबाजूचे तिला सोडवण्याचा प्रयत्न करत असूनही ते अजिबात केस सोडत नाही. अखेर मुलीचे केस सोडल्यानंतर मुलगी आणि तिच्या सोबतचे लोक माकडावर पुन्हा राग व्यक्त करतात. मग ही मुलगी पुढे जात असताना माकड अतिशय शिताफीने पुन्हा तिला पकडते आणि केस ओढते.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये माकडांशी मस्ती करणे कशाप्रकारे महागात पडू शकते हे अगदी सहज दिसून येते. हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर कर्मा म्हणत या व्हिडिओची मज्जा लुटली आहे. मात्र अशाप्रकारे प्राण्यांशी मस्ती करणे महागात पडू शकते हे लक्षात घ्यायला हवे. ही घटना कुठे घडली हे मात्र समजू शकले नाही.