सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. यामध्ये प्राण्यांचे व्हिडियोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यातही प्रामुख्याने माकड, हत्ती यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. कधी हे प्राणी माणसांशी खेळताना दिसतात तर कधी जंगलात आणखी काहीतरी करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी हत्तीण आणि तिचे पिल्लू गाण्याच्या तालावर नातचाना दिसले होते. तर कधी हत्ती पर्यटकांशी मज्जा-मस्ती करताना दिसतात. नुकताच असाच हत्तीच्या पिल्लाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये हे पिल्लू दुधासाठी हट्ट करताना दिसत आहे (Viral Video Of Baby Elephant Asking for Milk).
एक हत्तीचे पिल्लू कॅफेटेरीयामध्ये येताना दिसते. त्याच्यासोबत त्याचा केअरटेकर असून त्याच्या हातात दुधाची बाटली असल्याचे दिसते. हे हत्तीचे पिल्लू या दुधासाठी त्याच्याकडे हट्ट करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. केअरटेकर दूध तयार करत असताना या पिल्लाला थांबायचे नसून त्याला लगेचच दूध हवे असल्याने तो काहीसा हट्ट करत असल्याचे त्याच्या हालचालीतून दिसते. लहान मुलं जन्माला आल्यानंतर बराच काळ दुधावर असतात. त्यावेळी दुधासाठी तेही असाच हट्ट करतात. त्याचप्रमाणे हा हत्ती दुधासाठी हट्ट करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या या वागण्यामुळे याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांचेही चांगलेच मनोरंजन होत असल्याचे दिसते.
केअरटेकर दुधाच्या बाटलीत कोणती पावडर घालत असतो. मात्र या पिल्लाला तेवढाही धीर नसून त्याला लगेचच दूध हवे असल्याने तो एक पाय वर करुन एकप्रकारचा आवाज काढून काहीसा हट्ट करताना दिसतो. नंतर हा केअरटेकर हत्तीच्या पिल्लाला हे दूध पाजताना दिसतो आणि मग हे पिल्लू काहीसे शांत झालेले दिसते. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून महिन्याभरात लाखो जणांनी हा व्हिडिओ लाईक केला असून २ लाख ६४ हजार २७५ जणांनी तो लाईक केला आहे. अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून हत्तीच्या क्यूटनेसबद्दल बऱ्याच जणांनी त्याचे कौतुक केले आहे.