इंटरनेटवर सगळ्यात जास्त पाहिली जाणारी गोष्ट कोणती असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर डान्स असंच असावं. व्हिडिओ, रील्स किंवा आणखी वेगवेगळ्या माध्यमातून केले जाणारे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडीयावर सर्वात जास्त पाहिले जातात. कधी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत तर कधी आणखी काही कारणाने नाचणारे लोक या व्हिडिओमध्ये एकाहून एक डान्स करताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये हरीयाणाचा असलेला तरुण आपल्या परदेशी बायकोसोबत डान्स करताना दिसत आहे. हरीयाणवी गाणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडींगमध्ये असून हे दोघेही या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत (Viral Video of Boy Dance with Australian Wife on Haryanvi Song).
या तरुणासोबत असलेली त्याची पत्नी मूळची ऑस्ट्रेलियन असून तीही अतिशय परफेक्टली गाण्याच्या बोलानुसार हावभाव करताना दिसते. तसेच भारतीय पारंपरिक पंजाबी ड्रेसमध्ये ती अतिशय उत्साहाने डान्स करत असल्याने तिचे कौतुक होत आहे. ‘हम हरयाणावे छोरे...’ असे या गाण्याचे बोल असून हे दोघेही त्यावर अतिशय नेमकेपणाने स्टेप्स करत असल्याचे दिसते. सुरुवातीला ते दोघे चालत एकमेकांचे हात पकडून येतात आणि मग गाण्याच्या बोलावर काही स्टेप्स करत एकमेकांसोबत नाचतात. या मुलांने काळ्या रंगाचा पठाणी स्टाईल ड्रेस घातला असून त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावही पाहण्यासारखे आहेत.
इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १५ लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून ९१ हजारांहून जास्त जणांनी त्याला लाईक केले आहे. इतकेच नाही तर लोकांनी यावर काही ना काही प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन तरुणी असून ती भारतीय संस्कृतीचा करत असलेला पुरस्कार यावरुन तिचे कौतुक होताना दिसत आहे.