लग्नमंडपात नवऱ्याची एन्ट्री म्हणजे आपल्याकडे मोठा सोहळा असतो. घोड्यावरुन वरात काढून येणारा नवरदेव, त्याला घातलेल्या पायघड्या आणि त्याला मंडपात आणण्यासाठी सज्ज असलेली मुलीकडची मंडळी. मग त्याचे पाय धुवून त्याला औक्षण करुन अतिशय मानाने त्याला मंडपात आणून बोहल्यावर उभे केले जाते. त्यानंतर मुलीचे मामा मुलीला घेऊन येतात. नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दिलेला हा मान असतो. पण असा मान तर सोडाच एका नवरीने लग्ननमंडपात प्रवेश करताच आपल्या नवऱ्याला धू-धू धुतला. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला असून त्यावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आता तिने असे का केले याबाबत समजून घेणे औत्सुक्याचे ठरले आहे (Viral Video of Bride and Groom Entry to Marriage Hall Groom was beaten by Bride).
तर आपलं लग्न आणि त्याची एन्ट्री खास व्हावी अशी अनेकांची इच्छा असते, त्याचप्रमाणे या जोडप्याचीही तशीच इच्छा होती. तुम्ही WWE चे चाहते असाल तर काही क्षणातच नवरीचं हे कृत्य तुमच्या लक्षात आल्याावाचून राहणार नाही. ही नवरीमुलगी WWEची मोठी चाहती आहे. डब्लूडब्लूई इतिहासातील सर्वात प्राणघातक फिनिशर म्हणून ओळखल्या जाणार्या, स्टीव्ह ऑस्टिनचा स्टोन कोल्ड स्टनर चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होता. ही वधूदेखील तिची चाहती असावी, कारण तिने रिसेप्शनमध्ये हटके एन्ट्रीसाठी नवदेवासोबत रेस्टिंग फिनिश मूव्ह करत एन्ट्री केली. तिच्या या मूव्हमुळे उपस्थितांना मात्र काही काळ धक्काच बसला. नेमका प्रकार काय आहे हे लक्षात येईपर्यंत ही नवरी अचानक अशी का करते असा प्रश्नच येथील उपस्थितांच्या मनात निर्माण झाला. मग काही वेळाने तिने केलेला हा प्रकार खरा नसून ते नाटक असल्याचे उपस्थितांना कळते आणि त्यांच्या जिवात जीव येतो.
एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटावे असे हे दोघे हॉलमध्ये एन्ट्री घेतात आणि अगदी काही क्षणांत ही नवरी नवरदेवाचा ब्लेझर काढून त्याच्या पोटात लाथ घालते. तेवढ्यात तो तिला उचलून आपटतो आणि स्वत:ही खाली पडतो. इतकेच नाही तर बाजुने एक रेफरी येऊन त्यांना जज करतो. मग अगदी खरी मॅच वाटावी असा हा सीन तयार होतो. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे आणि आतापर्यंत लाखो जणांनी तो पाहिला आहे. जवळपास ५८ हजार जणांनी हा व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. असे करणे अजिबात योग्य नाही. मी आजपर्यंत पाहिलेली सर्वात वाईट गोष्ट आणि लग्नाच्या दिवशी एन्ट्री करताना असले काहीतरी का करावे असा प्रश्न यानिमित्ताने नेटीझन्सनी उपस्थित केला आहे. तर काहींना एन्ट्रीचा हा प्रकार फारच आवडल्याने त्यांनी या कपलचे आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.