लग्न हा आपल्यासाठी सेलिब्रेट करण्याचा एक मोठा इव्हेंट असतो. विशेषत: मुलींच्या लग्नाबाबत संमिश्र भावना असतात. एकीकडे उत्सुकता, आनंद, दु:ख, काहीशी निराशा असं सगळं एकावेळी दाटून आलेलं असतं. लग्नाच्या सोहळ्यातील प्रत्येक क्षण सेलिब्रेट करावा यासाठी आपण आणि आपल्या घरातील मंडळी आटोकाट प्रयत्न करत असतात. मग यामध्ये मेहंदी, संगीत अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरी-नवरा आणि दोन्ही घरातील मंडळी या सगळ्या समारंभांचा अतिशय उत्तमरित्या आनंद लुटताना दिसतात. मात्र या सगळ्या प्रसंगात जिला आपण जीवापाड जपले ती मुलगी दुसऱ्या घरी जाणार म्हणून मुलीच्या बापाच्या डोळ्यात मात्र आसवं असतात. ही आसवं लपवत हा बाप आपण आनंदी आसल्याचं दाखवत असतो (Viral Video of Bride Dance with her Father).
नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये नववधू आणि तिचे वडील डान्स करताना दिसत आहेत. तर सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवरी मुलगी पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये आपल्या वडिलांसोबत डान्स करताना दिसत आहे. या दोघांचे कोऑर्ड़ीनेशन इतके उत्तम आहे की ते डान्सच्या सगळ्या स्टेप्स अगदी सारख्या पद्धतीने करताना दिसतात. लग्नसोहळ्याच्या निमित्ताने एका हॉलमध्ये हे दोघे मन लावून डान्स करताना दिसत आहेत. या दोघांची डान्सची एनर्जी पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही, याचे कारण म्हणजे या वडिलांचे वय ६० ते ७० वर्षांच्या दरम्यान असावे.
हा व्हिडिओ ब्रिटनी रेवेल नावाच्या एका युजरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. य़ा व्हिडिओला कॅप्शन देताना लिहीले आहे, “ मी हे सांगू शकत नाही की मिडल स्कूलपासून वडिलांना या स्टेप्स शिकवण्यास किती मजा येते.” व्हिडिओवर असलेल्या टेक्स्टमध्ये लिहीले आहे, “पॉईंट ऑफ व्ह्यू - जेव्हा तुम्ही २००० च्या दशकाच्या सुरुवातीला मोठे होता.” या बापलेकीच्या डान्सने उपस्थितांची मने जिंकल्याचे पाहायला मिळाले. ऑगस्टमध्ये अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ कोटी व्ह्यू मिळाले असून अनेकांनी त्य़ावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.