Lokmat Sakhi >Social Viral > याला म्हणतात प्रेम! बोहल्यावर चढण्याआधी नवरीने पाळीव कुत्र्यासाठी बघा काय केलं, व्हिडिओ व्हायरल

याला म्हणतात प्रेम! बोहल्यावर चढण्याआधी नवरीने पाळीव कुत्र्यासाठी बघा काय केलं, व्हिडिओ व्हायरल

Viral Video of Bride Feeding her Pet Dog before Getting Ready For Marriage : प्राणीही आपले हे लाड अतिशय छान पद्धतीने करुन घेतात आणि कुटुंबातील सगळ्यांशी अतिशय प्रेमाने वागतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2022 12:39 PM2022-12-08T12:39:57+5:302022-12-08T12:47:16+5:30

Viral Video of Bride Feeding her Pet Dog before Getting Ready For Marriage : प्राणीही आपले हे लाड अतिशय छान पद्धतीने करुन घेतात आणि कुटुंबातील सगळ्यांशी अतिशय प्रेमाने वागतात.

Viral Video of Bride Feeding her Pet Dog before Getting Ready For Marriage : This is called love! See what the wife did for the pet dog before climbing on the boat, the video went viral | याला म्हणतात प्रेम! बोहल्यावर चढण्याआधी नवरीने पाळीव कुत्र्यासाठी बघा काय केलं, व्हिडिओ व्हायरल

याला म्हणतात प्रेम! बोहल्यावर चढण्याआधी नवरीने पाळीव कुत्र्यासाठी बघा काय केलं, व्हिडिओ व्हायरल

Highlightsएका दिवसांत या व्हिडिओला ५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून पाळीव प्राण्यासोबत असलेला बॉन्ड यातून आपल्याला दिसून येतो. 'नवरीच्या प्रायोरीटीज ठरलेल्या असतात तेव्हा' असेही या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे.

ज्यांच्याकडे पाळीव कुत्रा किंवा मांजर असते त्यांना आपल्या या प्राण्याविषयी किती प्रेम असते हे अनेकदा आपण पाहतो. आपल्या मुलाप्रमाणे या प्राण्याचा सांभाळ केल्यावर तो प्राणीही त्या कुटुंबातील व्यक्तींना तितकाच लळा लावतो. हा प्राणी लहान असताना त्याला आंघोळ घालणे, आपल्या जवळ झोपवणे, फिरायला नेणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याला प्रेमाने खाऊ भरवणे. प्राणीही आपले हे लाड अतिशय छान पद्धतीने करुन घेतात आणि कुटुंबातील सगळ्यांशी अतिशय प्रेमाने वागतात. प्राण्यांवर असलेले प्रेम व्यक्त करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. यातील तरुणीचे आपल्या कुत्र्यावर असणारे प्रेम अजबच म्हणावे लागेल.

(Image : Google)
(Image : Google)

लग्न ही आपल्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची घटना. या दिवशी विधी, मेकअप आणि इतरही असंख्य गोष्टी सुरू असतात. त्यामुळे ऐन लग्नात आपण पूर्ण भांबावून गेलेले असतो. पण आपल्याच लग्नात एका नवरीने मेकअप अर्धवट ठेवून काय काम केले असेल तर ते आपल्या कुत्र्याला भरवण्याचे. या व्हिडिओमध्ये ही तरुणी बोहल्यावर चढण्याची तयारी करत असताना मधेच खोलीत खाली बसून कुत्र्याला भात भरवताना दिसते. लग्नात आवरायचे सोडून आधी आपल्या कुत्र्याला खायला भरवणाऱ्या या तरुणीचे कुत्र्याशी काय संबंध असतील याचा अंदाज आपल्याला आल्यावाचून राहत नाही. 

इन्स्टाग्रामवर सीमर के मेकअप या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्याता आला आहे. हे कुत्रेही अतिशय शांतपणे तिच्या हातून छान खात असल्याचे दिसते. या नवरीचे नाव दिव्या असून ती तिच्या बुन्झो नावाच्या कुत्र्याला भूक लागलेली असताना मेकअप अर्धवट सोडून खायला भरवत आहे असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 'नवरीच्या प्रायोरीटीज ठरलेल्या असतात तेव्हा' असेही या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे. एका दिवसांत या व्हिडिओला ५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून पाळीव प्राण्यासोबत असलेला बॉन्ड यातून आपल्याला दिसून येतो. 

Web Title: Viral Video of Bride Feeding her Pet Dog before Getting Ready For Marriage : This is called love! See what the wife did for the pet dog before climbing on the boat, the video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.