Join us

हाय रे तेरा घागरा!! चक्क LED लाईटिंग असणारा घागरा घालून नवरी आली मंडपात, बघा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2023 17:46 IST

Bride Wearing Ghagra Having LED Lights: चक्क लाईटिंग केलेला चमचमता घागरा पाहून नवरी मंडपात आली, आणि मग बघा तिथे काय मजा झाली.....

ठळक मुद्देखुद्द त्या नवरीनेच ती पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते की माझ्या लग्नात रात्री १० वाजता मंडपातली सगळी लाईट बंद झाली आणि......

स्वत:च्या लग्नात उत्साहाच्या भरात कोण काय करेल, हे काही सांगता येत नाही. नवरा- नवरीच्या घरच्या मंडळींना तर उत्साह असतोच, पण सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणारे नवरा- नवरीही खूपच फॉर्ममध्ये असतात. मग अशाच उत्साहाच्या भरात काहीतरी विपरित किंवा जगावेगळं करतात आणि मग चर्चेचा विषय होऊन बसतात. आता चक्क लाईटिंग लावलेला घागरा घालून मंडपात आलेली ही नवरी आणि तिचा होणारा नवरा यांचा किस्साही असाच भन्नाट.. (Viral video of bride wearing ghagra having LED lights)

 

rehabmaqsood या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून पाकिस्तानातल्या लग्नातली ही खरीखुरी गोष्ट आहे. खुद्द त्या नवरीनेच ती पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते की माझ्या लग्नात रात्री १० वाजता मंडपातली सगळी लाईट बंद झाली आणि चमचमता लाईटिंग लावलेला घागरा घालून मी मंडपात आले.

"नविन गोष्टी करायला माझी मुलं मुळीच घाबरत नाहीत, कारण.....", काजोल सांगतेय तिच्या मुलांच्या गोष्टी...

हा घागरा तिच्यासाठी तिच्या नवऱ्याने स्वत: डिझाईन केला होता. पिवळसर रंगाच्या त्या सुंदर घागऱ्यामध्ये नवरी अतिशय देखणी दिसत होती, यात वादच नाही. घागऱ्याला लाईटिंग लावण्याची कल्पना अनेकांना आवडली तर काहींनी त्यावर खूपच मजेशीर कमेंटही केल्या.

महिनाभरात वाढतील केस- होतील चमकदार, अभिनेत्री स्मिता शेवाळे सांगतेय तिच्या हेअर केअर टिप्स!

काही जणांनी आम्हालाही असा घागरा डिझाईन करून द्याल का, अशी विचारणा त्या नवरदेवाला केली असून त्यासाठी अंदाजे किती खर्च येताे, असंही विचारलं आहे.

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामलग्न