Join us  

रात्री भर रस्त्यात स्ट्रीट लाईटच्या उजेडात जोडप्याचा रोमँटिक डान्स, व्हायरल व्हिडिओ - नाच असा की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2022 2:03 PM

Viral Video of Couple Dancing in Street : डान्सच्या स्टेप्सही खूप छान असून त्या दोघांमधील सिंक्रोनायजेशनही अतिशय चांगले

ठळक मुद्देअवघ्या १६ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास २.५ लाख जणांनी पाहिला असून १.५ हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केला आहे.रात्रीच्या वेळी सगळीकडे सामसूम असताना एका स्ट्रीट लाईटच्या खाली अतिशय सुंदर असा डान्स करतात.

डान्स हा आपल्यासाठी कधी व्यक्त होण्याची कला, कधी छंद तर कधी आपल्या संस्कृतीचे प्रतीक असते. डान्समुळे आपल्या शरीराचा जितका व्यायाम होतो तितकेच मन रिलॅक्स होण्यासाठीही डान्सचा अतिशय चांगला उपयोग होतो. डान्स हे ताण दूर करण्याचे एक उत्तम माध्यम असल्याने थेरपी म्हणूनही बरेचदा डान्सचा वापर केला जातो. लग्नात, गणपतीच्या मिरवणूकीमध्ये किंवा एखाद्या पार्टीला गेल्यावर आपण अतिशय मनसोक्त नाचतो. मित्रमंडळींसोबत तर आपण अशाप्रकारे डान्स करणे आपण सगळेच खूप एन्जॉय करतो. नुकताच असाच एक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये एक कपल मनसोक्त डान्स करताना दिसत आहे (Viral Video of Couple Dancing in Street).

(Image : Google)

कपल डान्स म्हटला की आपल्याला साधारणपणे एखाद्या चित्रपटाची किंवा डान्स शोची आठवण येईल. पण एखाद्या चित्रपटाला शोभेल असे दृश्य व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून नुकतेच आपल्यासमोर आले आहे. यामध्ये एक कपल अतिशय बिनधास्तपणे रस्त्यात डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे दोघे दिवसाढवळ्या भर रस्त्यात डान्स करत नसून रात्रीच्या वेळी सगळीकडे सामसूम असताना एका स्ट्रीट लाईटच्या खाली अतिशय सुंदर असा डान्स करतात. त्यांच्या डान्सच्या स्टेप्सही खूप छान असून त्या दोघांमधील सिंक्रोनायजेशनही अतिशय चांगले असल्याचे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते. त्यामुळे त्यांच्यातील स्पिरीटचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. 

ट्विटरवर प्रेरणा माहेश्वरी या अकाऊंटवरुन सदर व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून हा या रस्त्याच्या बाजूला असलेल्या एखाद्या घराच्या किंवा इमारतीच्या टेरेसमधून शूट करण्यात आला आहे. कदाचित त्यांचा डान्स अशाप्रकारे कोणी रेकॉर्ड करेल याची त्यांना कल्पनाही नसेल. अवघ्या १६ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास २.५ लाख जणांनी पाहिला असून १.५ हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केला आहे. या दोघांमधील सिंक्रोनायजेशन आणि प्रेम पाहून बऱ्याच जणांनी त्यावर कमेंटसही केल्या आहेत. हे दोघे कोण आहेत, ते खरंच कपल आहेत की बहिण-भाऊ याबाबत मात्र अद्याप काही समजू शकले नाही. काही दिवसांपूर्वीच ४ मैत्रिणींचा टाइम्स स्क्वेअरवर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर एकदा एका तरुणीचाही टाइम्स स्क्वेअरवर डान्स करताना व्हिडिओ सोशल मीडियावरुन सगळ्यांसमोर आला होता.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्य