सोशल मिडियावर व्हायरल होणारे काही काही व्हिडिओ खरोखरच खूप मजेशीर (funny video) असतात. ते व्हिडिओ बघितले की पाहणाऱ्याचे भारीच मनोरंजन होते आणि मन फ्रेश झाल्यासारखे वाटते. सध्या एका लहानग्या मुलीचा (little girl) आणि हत्तीचा एक धमाल व्हिडिओ सोशल मिडियावर गाजतो आहे. दोघेही आपापल्या पद्धतीने मस्त नाचत आहेत (Viral Video of Dancing Elephant) आणि त्यांचा तो नाच बघून नेटीझन्सला दोघांचेही विशेषत: त्या हत्तीचे भारीच कौतूक वाटते आहे.
दिपांशू काबरा या आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्यायाम करायला वेळ नाही? तातडीने आहार बदला, ५ टिप्स- व्यायाम न करताही राहाल फिट
हा व्हिडिओ भारतातला की परदेशातला हे नेमकं स्पष्ट होत नाहीये. "Who did better? 😅" असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलं असून नेटीझन्सनी त्यावर भरभरून रिप्लाय दिले आहेत. या व्हिडिओमध्ये तो हत्ती आणि मुलगी ज्याठिकाणी उभे आहेत, ते ठिकाण अतिशय निसर्गरम्य वातावरणातलं आहे. मुलगी आणि हत्ती दोघेही एकदम आनंदात असल्याने एकमेकांना भरभरून दाद देत आहेत.
कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांप्रमाणेच वाघ, सिंह या जंगली प्राण्यांनाही योग्य प्रशिक्षण दिलं तर ते माणसांकडून काही गोष्टी शिकतात.
माणसांचं अनुकरण करण्याचा, आपल्या समोरचा व्यक्ती जे काय सांगतोय तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असतात. या हत्तीचंही तसंच आहे. या मुलीने त्याला शिकविण्याच्या दृष्टीने काहीही केलेलं नाही. पण तरीही तो मात्र बरोबर त्याच्या पद्धतीने तिचं अनुकरण करण्याचा आणि तिला दाद देण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हिडिओतली छोटीशी मुलगी कंबर हलवून, उड्या मारून त्याच्यासमोर नाचते आहे. त्यावर तो हत्ती कान आणि चेहरा हलवून तिच्याप्रमाणेच कृती करण्याचा प्रयत्न करतोय.