सोशल मिडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ खरोखरच खूप छान असतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे आपण सगळेच जण थंड पाणी पिण्यासाठी आतूर असतो. पाणी थंड करण्यासाठी शहरी लोक सर्रास फ्रिज, माठ असे पर्याय वापरतात. पण अशा कोणत्याच सुविधा नसतानाही अगदी फ्रिजसारखं थंडगार पाणी कसं करायचं याविषयीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (how to make freeze like cold water in plastic bottle?)
divyasinha266 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही दिवसांपुर्वी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांतच या व्हिडिओला तब्बल एक लाखांपेक्षाही अधिक लाईक्स आणि कित्येक कमेंट आल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये एक अतिशय गरीब कुटूंबातली महिला दिसते आहे जी अगदी खेडेगावात राहाते आणि तिच्याकडे माठ, फ्रिज अशा कोणत्याही सुविधा नाहीत. पण उन्हामुळे जिवाची काहिली होते, त्यामुळे थंड पाणी तर प्यावं वाटतं.
त्यामुळेच तिच्या भावाने एक जुगाड केलं. त्याने एका साध्या बाटलीमध्ये पाणी भरलं. त्या बाटलीला एक ओलं फडकं गुंडाळलं आणि ती बाटली मोकळ्या हवेत झाडाला टांगून दिली. हवेमुळे बाटली हलली जाते आणि पाणी गार होत जातं.
तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरले तर वाढतो कॅन्सरचा धोका, ICMR सांगते, तेल पुन्हा वापरायचंच तर....
या व्हिडिओमधली ती महिला सांगते आहे की बाटली अशा पद्धतीने भरून ठेवल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांतच तिच्यातलं पाणी खूप गार होऊन जातं. तिच्याभोवती गुंडाळलेला कपडा मात्र सुकू द्यायचा नाही. तिचा तो उत्साह पाहूनच अनेकांना तिच्या पॉझिटिव्ह ॲटीट्यूडचं कौतूक वाटलं आहे. कमी सोयी उपलब्ध असल्या तरी सकारात्मकतेने विचार केल्यास आहे त्या परिस्थितीतही कसं आनंदात राहता येतं, हेच ती त्या व्हिडिओतून सांगते आहे.