Lokmat Sakhi >Social Viral > लहान माझी बाहुली!! कारखान्यांमध्ये कशी तयार होते घाऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गालांची बाहुली? बघा व्हायरल व्हिडिओ

लहान माझी बाहुली!! कारखान्यांमध्ये कशी तयार होते घाऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गालांची बाहुली? बघा व्हायरल व्हिडिओ

Viral Video of Making Doll: तुम्हीही लहानपणी तुमच्या बाहुलीशी खेळला असालच ना? आता बघा हा व्हायरल व्हिडिओ... तुमची लाडाची बाहुली कारखान्यात कशी तयार झाली ते सांगणारा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 07:55 PM2023-08-16T19:55:10+5:302023-08-16T19:57:25+5:30

Viral Video of Making Doll: तुम्हीही लहानपणी तुमच्या बाहुलीशी खेळला असालच ना? आता बघा हा व्हायरल व्हिडिओ... तुमची लाडाची बाहुली कारखान्यात कशी तयार झाली ते सांगणारा.

Viral video of doll, Must see how dolls are made.. | लहान माझी बाहुली!! कारखान्यांमध्ये कशी तयार होते घाऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गालांची बाहुली? बघा व्हायरल व्हिडिओ

लहान माझी बाहुली!! कारखान्यांमध्ये कशी तयार होते घाऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गालांची बाहुली? बघा व्हायरल व्हिडिओ

Highlightsआपली लाडाकोडाची बाहुली खरंच कशी तयार होते, हे बघणं इंटरेस्टिंग असून त्यामुळेच आतापर्यंत १६ लाखांपेक्षाही जास्त लोकांनी व्हिडिओ बघितला आहे.

"लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली..." असं म्हणत बहुतांश सगळ्या मुली बाहुलीशी खेळत असतात. लहानपणी बाहुलीशी खेळली नाही, अशी एखादीच कुणीतरी सापडेल. बाहुलीचं रूप बदललं. पण मुलींचं तिच्याशी खेळणं मात्र बदललं नाही. पूर्वी कपड्यांची, चिंध्यांची बाहुली असायची. मग प्लास्टिकची आली आणि आता तर काय एकदम हाय- फाय बार्बी आली आहे. एकूणच काय बाहुलीचं रुप बदललं. पण मुलींच्या भावविश्वात मात्र ती अजूनही आहेच. तर अशी ही आपली लाडाची बाहुली कारखान्यांमध्ये कशी तयार केली जाते (Must see how dolls are made), हे सांगणारा हा व्हिडिओ (Viral Video) सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

kolkatareviewstar या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

वडे- भजी होतील कुरकुरीत, खमंग... कोणताही पदार्थ तळताना लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या टिप्स

बाहुली तयार करण्याच्या एका कारखान्यातला हा व्हिडिओ असून यामध्ये बाहुली बनविण्यासाठी मटेरियल कसं वापरतात, इथपासून ते पूर्ण बाहुली तयार कशी होते इथपर्यंतचा सगळा प्रवास दाखवण्यात आलेला आहे. आपली लाडाकोडाची बाहुली खरंच कशी तयार होते, हे बघणं इंटरेस्टिंग असून त्यामुळेच आतापर्यंत १६ लाखांपेक्षाही जास्त लोकांनी व्हिडिओ बघितला आहे.

 

या व्हिडिओत असं दिसतं की बाहुली तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ हा सुरुवातीला अगदी पातळ असतो आणि तो क्रिम रंगाचा असतो. नंतर तो एका साच्यात ओतून बाहुलीचे डोके तयार केले जाते.

प्रियांका चोप्राचं ६२ हजारांचं ब्रालेट टॉप, महागड्या टॉपची व्हायरल खास बात

नंतर त्याला डोळे बसवले जातात आणि मशीन शिलाई करून केस शिवले जातात. यानंतर बाहुलीचं इतर शरीर आणि हात तसेच पाय वेगवेगळ्या साच्यातून तयार होतात. नंतर हे सगळे साचे एकमेकांना जाेडले जातात. सगळ्यात शेवटी तिला छानसे कपडे घातले की ती सुंदरशी बाहुली मग आपल्या घरी येऊन खेळायला तयार असते. 

 

Web Title: Viral video of doll, Must see how dolls are made..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.