Lokmat Sakhi >Social Viral > हे काय भलतंच! वॉशिंग मशिनचा वापर करून चक्क गहू वाळवले!! पाहा व्हायरल व्हिडिओ

हे काय भलतंच! वॉशिंग मशिनचा वापर करून चक्क गहू वाळवले!! पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video Of Drying Gehu Or Wheat Using Washing Machine: वॉशिंग मशिनचा उपयोग अशाही पद्धतीने करता येतो, हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं.. बघा अतिशय मजेशीर व्हायरल व्हिडीओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 14:25 IST2025-02-13T14:24:40+5:302025-02-13T14:25:22+5:30

Viral Video Of Drying Gehu Or Wheat Using Washing Machine: वॉशिंग मशिनचा उपयोग अशाही पद्धतीने करता येतो, हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं.. बघा अतिशय मजेशीर व्हायरल व्हिडीओ..

viral video of drying gehu or wheat using washing machine, man used washing machine for drying wheat | हे काय भलतंच! वॉशिंग मशिनचा वापर करून चक्क गहू वाळवले!! पाहा व्हायरल व्हिडिओ

हे काय भलतंच! वॉशिंग मशिनचा वापर करून चक्क गहू वाळवले!! पाहा व्हायरल व्हिडिओ

Highlightsवॉशिंग मशिनचा उपयोग कपडे धुणे आणि वाळवणे या व्यतिरिक्त असाही करता येत असेल असं कोणाच्या डोक्यातही येत नाही.

तंत्रज्ञान सातत्याने बदलत आहे. आज घेतलेली एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू एखाद्या वर्षातच जुनी होऊन जाते कारण त्यामध्ये पुन्हा काहीतरी नवं आलेलं असतं. बदलत्या टेक्नोलॉजीशी जुळवून घेत मग आपण पण बदलू लागतो.. नव्या नव्या टेक्निकल गोष्टी शिकून घेऊ लागतो. काही लोक मात्र काळाच्या भलतेच पुढे असतात आणि त्यांचं डोकंही अचाट पद्धतीने धावतं.. त्यामुळेच तर आपल्या आसपासच्या वस्तूंचा ते अशा पद्धतीने वापर करतात की ते सामान्य माणसाच्या समजण्याच्या पलिकडे असतं. असाच एक वॉशिंग मशिनच्या उपयोगासंदर्भातला व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला असून वॉशिंग मशिनचा उपयोग कपडे धुणे आणि वाळवणे या व्यतिरिक्त असाही करता येत असेल असं कोणाच्या डोक्यातही येत नाही.(viral video of drying gehu or wheat using washing machine)

 

गहू वाळविण्यासाठी केला वॉशिंग मशिनचा उपयोग

वॉशिंग मशिनचा उपयोग चक्क ओले झालेले गहू वाळविण्यासाठी एका व्यक्तीने केला आहे. त्याच्या या कृतीचा व्हिडिओ altu.faltu या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून तो तुफान व्हायरल झाला आहे.

गालांवर खूप ओपन पोअर्स असल्याने चेहरा थोराड दिसतो? ५ टिप्स- त्वचा होईल नितळ- स्वच्छ

यामध्ये असं दिसत आहे की त्या व्यक्तीने ओलसर झालेले गहू एका ओढणीमध्ये बांधून ठेवले. त्यानंतर ती ओढणी त्याने वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये टाकली. त्याच्याकडे सेमी ऑटोमॅटीक या प्रकारातलं वॉशिंग मशिन असल्याचं दिसतं. त्यानंतर काही मिनिटांसाठी त्याने ड्रायर सुरू केलं. त्यानंतर जेव्हा त्याने ते गव्हाचं गाठोडं ड्रायरमधून काढलं तेव्हा त्याच्यातले गहू बऱ्यापैकी वाळलेले दिसून आहे.


 

वॉशिंग मशिनचा असाही उपयोग करता येऊ शकतो हे पाहून अनेक जण अचंबित झाले आहेत. या व्हिडिओला अतिशय मजेशीर कमेंट आल्या आहेत. काही जण म्हणत आहेत की आता त्या ड्रायरमध्ये एक ब्लेड बसवा आणि गिरणीप्रमाणे त्यात गहू टाकून दळून घ्या..

डॉक्टर सांगतात लाकडी चॉपिंग बोर्ड वापरणंही आरोग्यासाठी खूप घातक! त्याऐवजी 'याचा' करा वापर

काहींनी म्हटलं आहे की हा प्रयोग पाहून तर वॉशिंग मशिनच्या निर्मात्याची काय अवस्था झाली असेल.. काहींना ही ट्रिक खूप आवडली असून त्यांनी ती आम्हीही ट्राय करून पाहू असं म्हटलं आहे.. तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ पाहून?


 

Web Title: viral video of drying gehu or wheat using washing machine, man used washing machine for drying wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.