परदेशी लोकांना कायमच भारतीय संस्कृतीचे आकर्षण वाटते. इथले रंग, भाषा, वैविध्य हे सारे त्यांना मोहात पाडते. अनेकजण या जीवनपद्धतीचा अभ्यास करतात. त्यातले काही अनुसरण करतात. संगीत, अध्यात्म स्वीकारतात. त्याच प्रकारातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. (Foreign Singer Sang Hanuman Chalisa) एका विदेशी महिलेसह आणि तिचा पुरुष सहकारी आपल्या बँडसोबत हनुमान चालीसाचे पठण करताना दिसत आहे. आपल्याकडे हनुमान चालीसा प्रकरणात बरेच राजकारण झालेले असताना हा व्हिडिओ एक सुखद श्राव्य अनुभव ठरावा.
इंटरनेटवर लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारा 2 मिनिट 20 सेकंदाचा हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये महिला हातात गिटार घेऊन हनुमान चालीसा वाचताना आणि वाजवताना दिसत आहे. लोक हा व्हिडिओ पाहत आहेत आणि खूप पसंती दर्शवत आहेत. व्हिडिओमध्ये महिलेच्या बँडसोबत तिच्या अप्रतिम गायनाचेही कौतुक होत आहे.
व्यायाम करताना धक्का लागला म्हणून जीममध्ये दोन महिलांची तुफान हाणामारी; पाहा व्हिडिओ
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, जो लोक खूप बघत आहेत आणि शेअर करत आहेत. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये वाराणसीच्या संकट मोचन हनुमान मंदिरात परदेशी लोकांनी हनुमान चालीसाचे पठण केल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 117.2K व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी 12.1 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.