डान्स हा अनेकांसाठी अतिशय आव़डीचा विषय असतो. कधी एखाद्या कार्यक्रमात डान्स करुन तर तर कधी भर गर्दीमध्ये एखाद्या मिरवणुकीत आपण आपली डान्स करण्याची इच्छा पूर्ण करतो. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळी चॅलेंजेस घेणे सुरू असते. त्यामध्ये कधी गाणे म्हणून दाखवण्याचे तर कधी एखादी डेअरींग करण्याचे चॅलेंजेस असतात. इतकेच नाही तर कधी एखादे रील बनवत नाहीतर कधी एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतात. हे सगळे ठिक असले तरी हल्ली मेट्रोमध्ये नाहीतर ट्रेनमध्ये किंवा परदेशात एखाद्या प्रसिद्ध टॉवरवर डान्स करुन त्याचा व्हिडिओ करण्याचे फॅड वाढल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांत अशाप्रकारचे बरेच डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत (Viral Video of Girl Dance in Delhi Metro).
अशाप्रकारच्या व्हिडिओमध्ये आता आणखी एक भर पडली आहे. दिल्लीमध्ये एक तरुणी मेट्रोमध्ये भर गर्दीत मेट्रो सुरू असताना डान्स करतानाचा दिसत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये या तरुणीचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भर गर्दीत अशाप्रकारे डान्स करताना, त्याचे रेकॉर्डींग करताना आजुबाजूला असलेले लोक काय म्हणतील याची थोडीही चिंता या तरुणीला नाही. इन्स्टाग्रामच्या एका पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून डान्स करत असलेल्या तरुणीचा व्हिडिओ आणखी एक तरुणी रेकॉर्ड करत असल्याचे यामध्ये दिसत आहे. तर या दोघींचा व्हिडिओ दुसऱ्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केल्याचे आपल्याला यामध्ये पाहायला मिळते.
या तरुणीने ऑफ व्हाईट रंगाचा फ्रॉक आणि शूज घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यातील गाणे स्पष्ट ऐकू येत नसून ती करत असलेल्या स्टेप्स एकदम ग्रेसफूल असल्याचे दिसते. या पोस्टला कॅप्शन देताना कॉन्फिडन्स हो तो ऐसा असं म्हटलं आहे. हा व्हिडिओ ६ लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून ४२ हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेक जण त्यावर वेगवेगळ्या कमेंटसही करताना दिसत आहेत. या मुलीच्या डेअरींगवर आणि कॉन्फीडन्सवर तसेच तिच्या डान्सवर नेटीझन्स कमेंटस करताना दिसतात. एकूणच इतक्या गर्दीत या मुलीला डान्स करण्याची झालेली इच्छा आणि तिने ती प्रत्यक्षात उतरवल्याच्या गोष्टीची सोशल मीडियामध्ये बरीच चर्चा रंगल्याचे दिसते.