Join us  

बापरे! महाकाय मगरीला तरुणी करते प्रेमाने मसाज, व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2023 12:48 PM

Viral Video Of Girl Giving Body Massage to Dreaded Crocodile : मगरही न चिडता हे लाड अगदी प्रेमाने करुन घेताना दिसते.

ठळक मुद्देकाहींनी तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले आहे तर बऱ्याच जणांनी यावर गमतीशीर प्रतिक्रिया देत तिची खिल्लीही उडवली आहे.  ३ ते ४ दिवसांत जवळपास २ लाख ७३ हजार नेटीझन्सनी हा व्हिडिओ पाहिला

मगर असं नुसतं ऐकलं तरी आपल्याला धडकी भरते. प्रत्यक्षात तर आपण केवळ प्राणी संग्रहालयात किंवा एखादवेळी नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात मगर पाहिलेली असते. पण या मगरीचे रुप पाहून भल्या भल्यांना धडकी भरते. एका झडपेत शिकार करणारी ही मगर म्हणजे एक महाकाय प्राणी असते. अशा मगरीच्या जवळ जाण्याचा आपण विचारही करु शकत नाही. पण प्राणी प्रेमी असलेले लोक मात्र काहीही करु शकतात. ते प्राण्य़ांशी इतक्या सहजतेनी खेळतात की जंगलातील किंवा पाण्यातील महाकाय प्राण्यांचीही त्यांना विशेष भिती वाटत नाही (Viral Video Of Girl Giving Body Massage to Dreaded Crocodile). 

नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुणी मगरीशी अगदी सहज खेळताना दिसते. ही मगर जमिनीवरपहुडली असून ही तरुणी मगरीच्या अंगावरुन छान प्रेमाने हात फिरवते. इतकेच नाही तर तरुणी मगरीला शरीराच्या विविध भागांवर मसाजही करते. आपण एखाद्या व्यक्तीला ज्याप्रमाणे मसाज करतो त्याप्रमाणे ती तिचे हात, पाय, पाठ, खांदे लाडाने चेपताना दिसते. मगरीचे अंग काटेरी असल्याने तिला हात लावायचे धाडस तर आपण कधीच करणार नाही. पण ही तरुणी अगदी सहजरित्या या मगरीच्या अंगावरुन हात फिरवताना दिसते. इतकेच नाही तर मगरही न चिडता हे लाड अगदी प्रेमाने करुन घेताना दिसते. मात्र हा व्हिडिओ पाहून आपल्याला या तरुणीच्या धाडसाचे आणि मगरीचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. 

ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून फिगन या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या ४७ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये तरुणीचे धाडस कौतुक करावे असेच आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि ही तरुणी कोण आहे याबाबत विशेष माहिती मिळाली नाही. अवघ्या ३ ते ४ दिवसांत जवळपास २ लाख ७३ हजार नेटीझन्सनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईक करत त्याला रिट्वीटही केले आहे. काहींनी तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले आहे तर बऱ्याच जणांनी यावर गमतीशीर प्रतिक्रिया देत तिची खिल्लीही उडवली आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया