आपण अनेकदा रस्त्याने ये-जा करतो तेव्हा आपल्याला रस्त्याच्या कडेला बसलेली किंवा रस्त्यावरुन फिरणारी लहान मुलं दिसतात. कधी ही मुलं आपल्या सिग्नलवर काहीतरी विकत असतात किंवा कधी पैसे मागत असतात. काहीवेळा फूटपाथवर बसून आपल्या आई-वडिलांसोबत दंगामस्ती करत असतात. गाडी सिग्नलला थांबलेली असताना त्यांना पाहून आपल्याला बरेचदा कीव येते. मग कधी आपण या मुलांना पैसे देतो तर कधी आपल्याकडे असलेला खाऊ देतो. पण काही जण त्यापलिकडे जाऊन या मुलांसाठी काम करतात. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे (Viral Video of Girl Giving Water to Kids on Street).
या व्हिडिओमध्ये एक तरुणी रस्त्यावरच्या लहान मुलांना आपल्या बाटलीतून पाणी पाजताना दिसत आहे. अनेकदा आपण हे लोक स्वच्छ आहेत की नाही म्हणून त्यांच्या आजुबाजूला जायला टाळतो. पण असा कोणताही आडपडदा न ठेवता ही तरुणी आपल्या बाटलीने या मुलांची तहान भागवताना दिसते. भर रस्त्यात ही मुलगी या मुलांना अतिशय प्रेमाने पाणी पाजताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही दोन्ही मुले तहानलेली असल्याने ती पोटभर पाणी पितात आणि त्यानंतर हसत निघून जातात. उन्हातान्हात फिरुन लहानग्यांना लागलेली तहान भागवणाऱ्या या तरुणीचे सोशल मीडियावर तिचे बरेच कौतुक होताना दिसते.
My Heart ❤ pic.twitter.com/ClPLhYv23f
— Aarz-e-ishq (@Aarzaai_Ishq) December 26, 2022
ट्विटरवर अर्ज ए इश्क या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या २९ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये या तरुणीची कृती पाहून अजूनही माणूसकी शिल्लक आहे यावर आपला विश्वास बसतो. अवघ्या दोन दिवसांत तब्बल ८४ हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून ४ हजारहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे. बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ रिट्विट केला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत या मुलीचे कौतुक केले आहे.