Join us  

फोटोसाठी भारी पोज म्हणून तरुणी सिंहाच्या बाजूला जाऊन उभी राहिली.. मात्र सिंह वैतागला आणि.. पाहा व्हायरल व्हिडिओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 11:33 AM

Viral Video Of Girl With Lion While Posing for Photograph : ही तरुणी सुरुवातीला सिंहाच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरुन त्याच्या आयाळीमधून हात फिरवताना दिसते.

ठळक मुद्देअनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून काहींनी त्यावर वेगवगेळे प्रश्नही विचारले आहेत. काही वेळा प्राणी माणसाळलेले असतील तरी त्यांनाही मुद्दाम काही करायला लावल्यावर कंटाळा येऊ शकतो.

सिंह म्हणजे जंगलचा राजा आणि हिंस्र प्राणी अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते. सिंहाला आपण टिव्हीमध्ये किंवा चित्रातच पाहतो. काही जणांनी मात्र या प्राण्याला संग्रहालयात एखाद्या मोठ्या कुंपणाच्या आत पाहिलेले असते. मात्र सिंहाची डरकाळी आणि त्याचे भव्य रुप पाहून काहीसे घाबरायलाच होते तर त्याच्या जवळ जाणे तर सोडाच. पण काही ठिकाणी जंगली प्राणी इतके माणसाळलेले असतात की आपण त्यांच्या जवळ गेलो तरी ते कोणताही हिंस्र प्रकार करत नाहीत. अशा प्राण्यांच्या जवळ जाऊन त्यांना हात लावण्याचे किंवा अगदी त्यांच्यासोबत फोटो काढण्याचे धाडस काही लोक करताना दिसतात (Viral Video Of Girl With Lion While Posing for Photograph). 

नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक सुंदर दिसणारी तरुणी सिंहांच्या जवळ जाऊन फोटोसाठी पोज देताना दिसते. २ सिंह एका बाजेवर अगदी निवांत बसलेले असून त्यांना साखळीने या बाजेला बांधलेले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. ही तरुणी सुरुवातीला सिंहाच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरुन त्याच्या आयाळीमधून हात फिरवताना दिसते. इतकेच नाही तर त्यानीही आपल्यासारखी फोटोसाठी छान पोज द्यावी अशी तिची अपेक्षा असते. मात्र सिंह काहीशा वेगळ्याच मूडमध्ये असल्याचे दिसते. बाजेवर बसलेल्या सिंहाचे दोन पाय मात्र जमिनीवर असून तो इकडे तिकडे पाहताना दिसतो. त्याने फोटोसाठी समोर पाहावे यासाठी ही तरुणी त्याला प्रेमाने कुरवाळते.

 काही वेळ गेल्यावर हा सिंह समोर पाहतोही. मात्र तो इतकी मोठी जांभई देतो की त्याचा खूप मोठा असा संपूर्ण जबडा आपल्याला दिसतो. त्यामध्ये त्याचे असलेले दात, जीभ हेही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतात. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून २२ हजारांहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे. अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून काहींनी त्यावर वेगवगेळे प्रश्नही विचारले आहेत. मात्र हा सिंह आणि व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया