महिला आणि मुलींमध्ये कधी कोणत्या कारणावरुन कसं भांडण जुंपेल सांगता येत नाही. कधी घरात होणारी महिलांची भांडणं तर कधी जागेवरुन लोकल ट्रेनमध्ये महिलांची होणारी भांडणं आपण पाहतो. काही वेळा ही भांडणं इतकी विकोपाला जातात की महिलाही कशाची भिडभाड न ठेवता मारामारी करताना दिसतात. सोशल मीडियावर याप्रकारचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि नेटीझन्सही आवडीने हे व्हिडिओ पाहतात. नुकताच २ तरुणींचा असाच जबरदस्त हाणामारी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये या तरुणी क्लासरुममध्ये जोरदार मारामारी करताना दिसत आहेत. आता त्याचे कारण ऐकल्यावर तुम्हाला हसायला आल्यावाचून राहणार नाही (Viral Video Of Girls Fight).
तर आपल्या दोघींमध्ये कोण जास्त हॉट आहे यावरुन या तरुणींमध्ये भांडणे सुरु झाली. ही भांडणं इतकी टोकाला गेली की त्यांनी एकमेकींना मारायला सुरुवात केली. नंतर तर व्हिडिओमध्ये त्या एकमेकींचे केस ओढत असल्याचे आणि जोरजोरात मारामारी करत असल्याचे दिसते. त्यांची मारामारी इतकी वाढते की नंतर याठिकाणी असलेले लॅपटॉपही खाली पडताना दिसतात. त्यामुळे या पोस्टला कॅप्शन देताना लॅपटॉपला श्रद्धांजली वाहिली आहे. सुरुवातीला क्लासमधील इतर विद्यार्थी त्यांच्या भांडणात सहभागी होत नाहीत. मात्र नंतर काही जण हे भांडण सोडवायला आल्याचे दिसते.
ट्विटरवर बेस्ट गर्ल्स फाईट या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. २३ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये या २ मुली जोरदार मारामारी करताना दिसत आहेत. ट्विटरवर काही तासांत ८० हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून लोक त्यांच्या मारामारीची मजा लुटताना दिसत आहेत. इतकेच नाही तर अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून काहींनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.