एखादी गोष्ट करण्याची जर मनापासून इच्छा असेल तर तुमचं वय कधीच आडवं येऊ शकत नाही.. असंच काहीसं सांगणारा हा व्हिडिओ.. एरवी चारचौघांत वय सांगायला अनेक जणींना नको- नको वाटतं. पण व्यायाम, फिटनेस किंवा खेळ, छंद अशा काही गोष्टी आल्या की आपोआप तिशी- चाळिशीत गेलेल्या अनेक जणी त्यांचं वय पुढे करतात आणि अंग काढून घेतात. म्हणूनच या सगळ्या आजी एकदा बघाच.. त्यांनी त्यांचं वय विसरून दणक्यात मारलेल्या दोरीवरच्या उड्या सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाल्या आहेत. (viral video of granny playing jumping rope)
दोरीवरच्या उड्या मारणाऱ्या या सगळ्या आजींचा एक छानसा व्हिडिओ GoodNewsMovement या ट्विटर पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यासगळ्या आजी विदेशातल्या आहेत. दोरीवरच्या उड्यांचा जो खेळ या आजी खेळत आहेत, तो खेळ आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी खेळलाआहे. दोघांनी दोन्ही बाजूंनी दोरी पकडायची आणि गाेलाकार फिरवायची. आणि एका जणाने मधोमध उभे राहून उड्या मारायच्या. अगदी असाच खेळ या आजी खेळत आहेत. एका आजींनी तर कमालच केली. सलग एका दमात २५ पेक्षाही अधिक उड्या मारून त्यांनी नेटकरी मंडळींना थक्क केले आहे. या सगळ्या आजींना हा खेळ खेळताना जेवढा आनंद येत आहे, तेवढीच मजा तुम्हाला व्हिडिओ बघताना येईल, अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे.
दोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे (benefits of rope exercise)- दोरीवरच्या उड्या हा एक संपूर्ण व्यायाम मानला जातो. कारण यामध्ये तुमच्या सगळ्या शरीराचा व्यायाम होतो.- दोरीवरच्या उड्या मारताना त्या एका लयीत असाव्या लागतात. त्यामुळे अशावेळी तुम्ही एकाग्र असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे एकाग्रता वाढण्यासाठीही दोरीवरच्या उड्या उपयुक्त ठरतात.- शरीरावरची अतिरिक्त चरबी वितळविण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम होतो.- दोरीवरच्या उड्या नियमित मारल्याने लहान मुलांची उंची वाढते.