लग्नघर असलं की महिला वर्गाची विशेष मजा असते. आधी क्लिनअप, फेशियल अशा सगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट्स आणि नंतर मग मेकअप.. पुर्वी हे फक्त नवरी किंवा नवरदेवासाठीच असायचं. किंवा फार फार तर त्यांच्या करवली हे सगळं करून घ्यायच्या. पण आता मात्र लग्नघरातल्या सगळ्याच जणी अगदी हौशीने सगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट्स आणि नंतर छानसा मेकअप करून घेतात. एखादी ब्युटीशियन त्यासाठी बूक करून ठेवलेलीच असते. अशाच एका लग्नघरात या एक हौशी आजी ( Granny is doing makeup) सध्या सोशल मिडियावर चांगल्याच ट्रेण्डिंग (viral video) ठरल्या आहेत.
jasmeenkaurmakeovers या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून my cutest client असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
प्रवासात मळमळ- उलट्यांचा त्रास होतो? १ सोपा उपाय, मोशन सिकनेस लगेचच होईल कमी
यामध्ये ज्या आजी आहेत, त्यांचं वय साधारण ७५ च्या पुढेच असावं, असं वाटतं. त्या आजींना ब्यूटीशियन विचारते "नानीजी कैसा मेकअप चाहिये आपको?", त्यावर त्या आजी मोठं गोड उत्तर देतात. त्या म्हणतात "मुझे तो बस थोडा हलकासा मेकअप चाहिये.. बाकी तो मै ठिक हू..". एरवी त्या वयातल्या इतर आजी असत्या तर मेकअपला लगेचच नकार दिला असता. पण या आजींनी मात्र आपल्याला हलकासा मेकअप पाहिजे असल्याचं लगेच सांगून टाकलं.
त्यानंतर आजी मेकअप करायला बसल्या. ब्यूटीशियनने त्यांचा छान अंबाडा घातला आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांना हलकासा मेकअप करूनही दिला.
केसांसाठी नॅचरल टॉनिक!! फक्त २ गोष्टी वापरा, केसगळती आणि कोंडा दोन्हीवर उत्तम उपाय
नंतर मेकअप कसा झाला, याविषयी तिने त्यांना विचारलं असता "थोडंसं काजळ तरी लाव", अशी प्रेमळ सूचना त्यांनी तिला दिली आणि हौशीने काजळही लावून घेतलं. मेकअप सुंदर झाला म्हणून आजींनी प्रेमाने त्या ब्यूटीशियनला मिठीही मारली. हौशी आजींचा हा धमाल व्हिडिओ एकदा बघायलाच हवा.