डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. लहान मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्सच्या स्टेप्स करतात आणि मग पाहुण्यांपुढे त्या सादर करुन दाखवतात. सुट्टीच्या दिवसांत तर लाहन मुलींसाठी हा एक उद्योगच असतो. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात. नुकताच सोशल मीडियावर असाच एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ६ मुली अतिशय भन्नाट अशा डान्स करताना दिसत आहेत (Viral Video of Group Dance of Girls).
सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून ‘है सबसे जुदा, दिल तुझपे फिदा’ या गाण्यावर या मुली डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे बैठी घरे दिसत असल्याने त्या कदाचित याच ठिकाणी राहत असाव्यात असा अंदाज आहे. अगदी साध्याशा घरातल्या कपड्यात त्या या डान्स करत आहेत. मात्र तरीही त्यांच्या स्टेप्स आणि त्या ज्या एनर्जीने हे करत आहेत ते पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल भयानी या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.
त्यांच्यातले सिंक्रोनायजेशनही अतिशय उत्तम असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. या व्हिडिओला २ दिवसांत १ लाखांहून अधिक लाईक्स आले असून त्याहून जास्त जणांनी तो पाहिल्याचे दिसते. या आधीही याच तरुणींचा याच ठिकाणी शूट केलेला के सरा, सरा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्यात असणारे टॅलेंट यानिमित्ताने आपल्या समोर येत आहे. एखाद्या गोष्टीची आवड असेल आणि त्यासाठी धडपड करण्याची तयारी असेल तर तुमच्यातील कलागुण बाहेर आल्याशिवाय राहत नाहीत हेच नक्की.