लहान मुलांना बचतीची किंवा पैसे जपून ठेवण्याची सवय लागावी, म्हणून त्यांना पिगी बँक किंवा गुल्लक घेऊन दिले जाते. मोठेपणीही ही सवय कायम राहते आणि अनेकांची पिगी बँक त्यांना वर्षानुवर्षे साथ देते. आता जर पिगी बँक प्लास्टिकची असेल तर वारंवार तिचे झाकण उघडून जमा झालेली रक्कम काढून घेता येते. पण जर ते मातीचं गुल्लक असेल तर मात्र एकदाच फोडलं जातं. असं वर्षानुवर्षे पैसे टाकून गुल्लक (gullak) जेव्हा भरतं तेव्हा ते फोडताना भारीच एक्साईटमेंट वाटते. प्रत्येक जण त्यात जमलेली रक्कम जाणून घेण्यासाठी उत्सूक असतो.
अशीच जबरदस्त उत्सूकता नेटकरी मंडळींना त्या एका खास गुल्लकविषयी आहे.. गुल्लकमध्ये साठलेल्या नोटा पाहून तर नेटकरी थक्क झालेच आहेत, पण आता त्यांना ती नेमकी रक्कम किती, हे जाणून घेण्यात भारीच रस आहे... तर त्याचं झालं असं की सोशल मिडियावर (social media) सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की मातीचा एक गुल्लक आहे. आणि तो गुल्लक एक महिला फोडते आहे. ती जसा जसा हातोड्याने त्यावर घाव घालते आहे, तसतशा त्याच्यातून नोटा बाहेर येत आहेत. घडी घालून, दुमडून ठेवलेल्या कित्येक नोटा हळूहळू बाहेर येताना पाहणं खरोखरंच मजेशीर आहे..
अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ फेसबुकच्या Bhaiya hum Kanpuriya hain या पेजवर शेअर (facebook share) करण्यात आला असून Ye kiski gullak hai ? असं कॅप्शन त्याला देण्यात आलं आहे. आतापर्यंत तब्बल ४० मिलियन व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. हा व्हिडिओ मागच्यावर्षीच शेअर झाला असून आता तो पुन्हा नव्याने सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.. या बाईंकडे जमा झालेले पैसे एखाद्या बँकेपेक्षा कमी नाहीतच, अशा अनेक गमतीशीर कमेंट व्हिडिओला आल्या आहेत.