Lokmat Sakhi >Social Viral > Viral Video of Haldi : नादच खुळा! हळदीत नाचता नाचता पोरीच्या प्रेमात पडला; अन् भर मंडपात नंबरसुद्धा दिला

Viral Video of Haldi : नादच खुळा! हळदीत नाचता नाचता पोरीच्या प्रेमात पडला; अन् भर मंडपात नंबरसुद्धा दिला

Viral Video of Haldi : 'ती हळद आणि नंबर' असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 09:39 PM2022-05-01T21:39:01+5:302022-05-01T21:44:57+5:30

Viral Video of Haldi : 'ती हळद आणि नंबर' असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. 

Viral Video of Haldi : Love witha girl while dancing gave her mobile number viral video | Viral Video of Haldi : नादच खुळा! हळदीत नाचता नाचता पोरीच्या प्रेमात पडला; अन् भर मंडपात नंबरसुद्धा दिला

Viral Video of Haldi : नादच खुळा! हळदीत नाचता नाचता पोरीच्या प्रेमात पडला; अन् भर मंडपात नंबरसुद्धा दिला

लग्नाला किंवा हळदीला कुठेही गेल्यानंतर सुंदर सुंदर ड्रेसअप झालेल्या मुली, मुलं नेहमी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. कधी कधी नातेवाईकांच्या हळदीत एकमेकांना पहिल्यांदा पाहिल्यानंतर अनेकांची लव्हस्टोरी सुरू होते. (Viral Video of Haldi) गर्दीतला जो चेहरा आवडतो त्याच्याशी बोलावं, त्याची माहिती काढावी, संपर्क मिळवण्याची धडपड अनेकदा सुरू असते. असाच विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरलं जाणार नाही. (Love witha girl while dancing gave her mobile number viral video)

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता मुलगा बँडच्या तालावर नाचत आहे. तितक्यात त्याचं लक्ष खुर्चीवर बसलेल्या एका मुलीकडे जातं आणि तो तिला वारंवार पाहू लागतो. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो. तिला नंबर देण्यासाठीची धडपड त्याच्या हालचालींमधून स्पष्ट व्यक्त होते.  नाचत असताना तो बोटांचे हातवारे करतो. ती मुलगी सुद्धा एक एक नंबर टाईप करून घेते आणि त्याचा नंबर मिळवते. मध्येच नाचताना फोन वाजतो आणि मुलाचे नंबर देण्याचे सर्वच प्रयत्न सार्थकी लागतात. 

 बोंबला! पाठ खाजवण्यासाठी पठ्ठ्यानं केला जुगाड; क्रिएटिव्हीटी पाहून बायको झाली अवाक्

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्स हसणं काही कंट्रोल होत नाहीये. तर काहींना आपल्या वैयक्तिक जीवनातील एखाद्याचा नंबर मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, लव्हलाईफचे किस्से नक्कीच आठवले असतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रूमानी २२१ या ट्विटर युजरनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून ती हळद आणि नंबर असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. 

Web Title: Viral Video of Haldi : Love witha girl while dancing gave her mobile number viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.